नक्षलवाद्यांचा बीमोड करणारे सी-६० स्थापन्याची कल्पना ‘या’ IPS अधिकाऱ्याची !

नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळत नव्हते. म्हणून त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक के.पी. रघुवंशी यांनी सन १९९० मध्ये सी-६० पथकाची स्थापना केली
Naksal Gadchiroli
Naksal Gadchiroli

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीच्या पयडी-कोटमी जंगलात In the Paydi-Kotmi forest of Etapalli in Gadchiroli district आज पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चममक उडाली. यामध्ये १३ नक्षलवादी मारले गेले. 13 Naxalites were killed मृतांचा १६ पर्यंत वाढण्याचीही शक्यता वर्तविली गेली आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. Police took the bodies of 8 Naxalites into custody या कारवाई काही नक्षलवादी जखमी झाले आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले आहे. आज कारवाई म्हणजे सी-६० दलाचे मोठे यश मानले जात आहे. यानिमित्त जाणून घेऊया सी-६० चा इतिहास... Let's learn the history of C-60 on this occasion ...

पूर्वी जेव्हा गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन झाले नव्हते. तेव्हा नक्षली चळवळ जोमात होती. नक्षल्यांना जंगलांची खडानखडा माहिती असल्याने ते गनिमी काव्याने पोलिसांना हैराण करून सोडायचे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळत नव्हते. म्हणून त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक के.पी. रघुवंशी यांनी सन १९९० मध्ये सी-६० पथकाची स्थापना केली, अशी माहिती निवृत्त पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. 

श्री कदम म्हणाले, त्या काळात नक्षलवादी त्यांच्या गनिमी काव्यामुळे पोलिसांच्या हाती लागतच नव्हते. जंगलात कुठूनतरी गोळ्या झाडून पसार व्हायचे आणि पोलिस त्या दिशेने अंदाज घेत गोळीबार करत राहायचे. तेवढ्याच वेळात ते दुसरीकडे कुठेतरी कारवाई करून मोकळे व्हायचे. त्यामुळे यावर इलाज म्हणून सी-६० पथक तयार करण्यात आले. यामध्ये ६० शस्त्रसज्ज आणि पूर्ण प्रशिक्षित जवानांचा समावेश करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी होत असल्यामुळे नंतर ६० चे १०० - १५० अशी वाढ करत आज या पथकात जवळपास १००० जवान आहेत. या पथकाने नंतर मोठमोठ्या चकमकी यशस्वी केल्या. आज एटापल्लीच्या पयडी-कोटमीच्या जंगलात सी-६० केलेली ही कारवाई मोठी आहे. 

स्थानिक कर्मचारी असल्याचा फायदा
सी-६० पथकात प्रामुख्याने पोलिस दलातील गडचिरोली जिल्ह्यातीलच असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. कारण त्यांना जिल्ह्याची, जंगलांची, गावांची आणि गावकऱ्यांबाबत इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे नक्षलवाद्यांची माहिती ते चांगल्या प्रकारे मिळवू शकतात. त्याचा त्यावेळी पथकाला चांगला फायदा झाला. आता मात्र कारवायांचे स्वरूप बदलले. अत्याधुनिक शस्त्रात्र आले आहे आणि माहितीची खात्री झाली की लगेच कारवाई केली जाते, असे श्री कदम यांनी सांगितले. 

पोलीस निरीक्षक एस.व्ही. गुजर हे सी-६० चे पहिले प्रभारी अधिकारी होते. गडचिरोली जिल्हयात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने परत त्यांचेवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोलीला दोन विभागात विभाजन केले (उत्तर विभाग व दक्षिण विभाग) दक्षिण भागात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने प्राणहिता उप मुख्यालय येथे मार्च १९९४ साली सी-६० च्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली. सी-६० चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. हे पथक नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. सी-६० पथकाला यापूर्वी (क्रॅक कमांडो) या नावाने सुध्दा ओळखले जात होते.

धडक कारवाई
प्रशिक्षित सी-६० येथील जवान कठोर परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात जाऊन पहाडी व अतिदुर्गम भागांमध्ये नक्षल विरोधी अभियान राबवितात. दरम्यान नक्षल चळवळीमध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाइकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणाबाबत विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्यास त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना लोकशाहीच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. मात्र कट्टर नक्षल वरील शासकीय योजनेला व लोकशाहीला विरोध करून लोकांना शासनाविरुद्ध भडकवतात. अशा जहाल व कट्टर नक्षल्यांचा शोध घेऊन खात्मा केला जातो. तसेच त्यांचे व नक्षल चळवळीस आळा घालण्यास बहुमोल सहकार्य करणे तसेच अतिदुर्गम भागामध्ये जाऊन जनसंपर्क साधून शासनांचे विविध धोरण लोकांसमोर मांडून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम हे जवान योग्यरीत्या पार पाडत आहे.

जनतेशी सुसंवाद व त्यांच्या समस्या
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अति दुर्गम व जंगल भागात अशा ठिकाणी कोणीही शासकीय अधिकारी/ कर्मचारी जात नाही, अशा गावात सी-६० पथके जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतात जसे - वीज, रस्ते, तलाव, बोअरवेल, आरोग्य, शाळा, बससेवा व मुख्यालय येथे आल्यावर वरिष्ठ अधिकारी यांना सांगून संबंधित कार्यालयाकडून सदरची कामे पूर्ण  होईल, त्या अनुषंगाने इतर शासकीय विभागांतील कार्यालयातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करतो.

खेळ, व्यायाम व प्रशिक्षण
सी-६० पथक मुख्यालय येथे रिझर्व असताना शारीरिक दृष्ट्य़ा सक्षम राहण्याकरिता दररोज सकाळी शारीरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच त्यांना नक्षल विरोध अभियान राबविण्याकरिता वेळोवेळी नक्षल टॅक्टीस बद्दलची माहिती दिली जाते. तसेच त्यांना नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिवेशन लेक्चर, कमांडो मूव्हीज दाखविण्यात येतात.सी-६० पथकाला अति दुर्गम, संवेदनशील व पहाडी भागात ऊन, वारा, पाऊस, दिवस व रात्री येणाऱ्या आव्हानांना व समस्येला तोंड देण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम रहण्यासाठी त्यांना उच्च, विशेष व आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचे विविध राज्यांतील प्रशिक्षण संस्थेमध्ये जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी ग्रे-हाऊन्स हैदराबाद, एन.एस.जी. मनेसर- हरियाणा - हजारीबाग, कांकेर, यु.ओ.टि.सी. नागपूर पाठविले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com