चंद्रपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नेमणार : नाना पटोले

भाजपच्या नगरसेवकांच्या असंतोषाचे कारण मनपातील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत दडले आहे. राखी कंचर्लावार यांना महापौरपदी पक्षाने संधी दिल्यापासून भाजपच्या नगरसेवकांच्या एका गटात नाराजी पसरली होती.
Nana PatoleNana Patole
Nana PatoleNana Patole

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण सद्यस्थितीत तेथे सत्ताधाऱ्यांत दोन गट पडले आहेत. Two groups in rulling parti ही गटबाजी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर चांगलीच फोफावली. यांतील एका गटाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांच्याकडे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार केली Complent of corruption आणि सोबत पुरावेही सादर केले. येत्या ८ दिवसांत चौकशी समिती नेमण्याचे आश्‍वासन पटोले Nana Patole यांनी भाजपच्या नगरसेवकांना BJP Corporators दिले. यावेळी कॉंग्रेसेचेही नगरसेवक त्यांच्यासोबत होते. 

चंद्रपूर महानगर पालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांची राज्यशासनाने 
चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेस आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काल केली.  सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे दिले आहे. असे पत्रकार परिषदेत पटोले यांनी सांगितले. या गैरव्यवहाराची एखाद्या समिती मार्फत चौकशी केली जाईल, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. विधानसभेतसुद्धा मनपातील गैरव्यवहाराची प्रकरण लावून धरू असे पटोले म्हणाले. 

नाना पटोलेंनी चंद्रपूर कालच्या दौऱ्यात जिल्ह्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान भाजपच्या काही नगरसेवकांनी नाना पटोले यांची भेट घेतली. भाजपच्या नगरसेवकांचे दोन गट सध्या पालिकेत आहेत. त्यातील एका गटातील हे नगरसेवक असावे, असे बोलले जात आहे. या नगरसेवकांनी मनपातील अनेक कामांतील गैरव्यवहारांची लेखी तक्रार दिली, अशी माहिती पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या नगरसेवकांकडून मनपातील गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या आहेत, याला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी दुजोरा दिला. 
पंधरा दिवसांपूर्वी सन २०१५-१६ चा लेखापरीक्षण अहवाल समोर आला. या काळात महापौरपदी राखी कंचर्लावार आणि आयुक्त सुधीर शंभरकर होते. या अहवालात दोनशे कोटींची अनियमितता आढळली आहे. ३९ कोटींची वसुली सुचविली आहे. 

कॉंग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया यांच्यासह कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी लेखापरीक्षण अहवालासोबतच  मनपातील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली. तसे लेखी निवेदन दिले. यात महापौर राखी कंचर्लावार आणि तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याही चौकशीच्या मागणीची उल्लेख आहेत. याशिवाय भाजपचे नगरसेवकसुद्धा भेटल्याचे पत्रकार परिषदेत पटोले यांनी सांगितले. अमृत योजना, कचरा संकलन , कोविडच्या काळातील कामांत प्रचंड गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी राज्य शासनाने करावी, अशी मागणी या नगरसेवकांनी केली. या गंभीर प्रकरणाचे पुरावेसुद्धा या नगरसेवकांनी दिले आहेत, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले. 

जनतेच्या पैशाची या पद्धतीने आर्थिक लूट योग्य नाही. मनपातील अनियमिततेची एका समितीमार्फत चौकशी केली जाईल. विशेष म्हणजे येत्या आठ दिवसांत याप्रकरणी समितीचा निर्णय घेतला जाईल असेही पटोले म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. तसेच वेळप्रसंगी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली तर तिथे सुध्दा आम्ही भांडू, असेही ते म्हणाले. भाजपचे काही लोकप्रतिनिधी विधानसभेत केवळ स्वच्छतेचा आव आणतात. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेतील कारभार बघितला तर किती गैरव्यवहार सुरू आहे, हे लेखापरीक्षण अहवालातून समोर आले, असा टोलाही यांनी हाणला. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते. 

महापौरांविरोधात असंतोष
भाजपच्या नगरसेवकांच्या असंतोषाचे कारण मनपातील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत दडले आहे. राखी कंचर्लावार यांना महापौरपदी पक्षाने संधी दिल्यापासून भाजपच्या नगरसेवकांच्या एका गटात नाराजी पसरली होती. कंचर्लावार आणि त्यांचे नगरसेवक पती संजय कंचर्लावार आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. दोघेही पक्षात नवखे असताना मनपाची सूत्र निष्ठावंतांना डावलून कंचर्लावार यांच्या हाती दिले. त्यातच स्थायी समितीच्या सभापतिपदी रवि आसवानी यांना संधी दिली. सलग चार वेळा निवडून येणारे वसंता देशमुख यांना डावलले. त्यामुळे असंतोष आणखी वाढला. याच असंतोषातून भाजपच्या काही नगरसेवकांनी चक्क कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे 
मनपातील गैरकारभाराची तक्रार केली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com