इंटरमॉडेल स्टेशन : गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पाच पट झाडे लावणार...

इंटरमॉडेल स्टेशन हे ४४.४ एकर जमिनीवर विकसित होणार आहे. अधिक सुविधा, निवासी गाळे, दुकाने या जमिनीवर होणार आहेत. हे सर्व करताना २०२३ झाडे वाचविण्यात आली आहेत, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले आहे.
Inter Model Station - Nitin Gadkari
Inter Model Station - Nitin Gadkari

नागपूर : शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या अजनी परिसरात इंटरमॉडेल स्टेशन Inter Model Station विकसित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण यासाठी तेथील चार ते पाच हजार झाडे तोडण्यात येणार Four to five thousand trees will be cut down असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात नागपूरकर सरसावत आहेत. अशात तोडलेल्या झाडांच्या पाच पट झाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लावणार The National Highways Authority will plant five times as many trees असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. 

यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात, अजनी येथे होऊ घातलेल्या इंटरमॉडेल स्टेशन विकसित करण्यासाठी जी झाडे कमी केली जातील, त्यापेक्षा ५ पट अधिक व उभी असलेली झाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शंकरपूर येथील वनविभागाच्या जमिनीवर लावणार आहे. या प्रकल्पात ४५२२ झाडे कमी होतील. त्याबदल्यात प्राधिकरण पाचपट अधिक झाडांची लागवड करणार आहे. या प्रकल्पात उड्डाण पूल आणि त्याला जोडले जाणारे अ‍ॅप्रोच रोड यांसाठी ४०८ झाडे कमी होतील. तसेच इंटरमॉडेल स्टेशन हे ४४.४ एकर जमिनीवर विकसित होणार आहे. अधिक सुविधा, निवासी गाळे, दुकाने या जमिनीवर होणार आहेत. हे सर्व करताना २०२३ झाडे वाचविण्यात आली आहेत, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले आहे.

अजनी येथे इंटर मॉडेल स्टेशन उभारण्यासाठी जवळपास ४ ते ५ हजार झाडांची कत्तल करण्याची परवानगी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महानगरपालिकेला मागितली आहे. यावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप आहे. आधी ५ मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वी करून दाखवा मगच प्रत्यारोपणाची परवानगी द्या. पण हे करताना सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या देखरेखीखाली हे कार्य करावे, अशी मागणी तेजस सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे. 

वृक्ष प्रत्यारोपण करण्याच्या गोंडस नावाखाली परवानगी मागितली आहे. मात्र ही प्रक्रिया फारशी यशस्वी नाही, खरंच ते शक्य असेल तर आधी ५ मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वी करून दाखवा व नंतर प्रत्यारोपणाची परवानगी देताना सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या देखरेखीखाली हे कार्य करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही. कापलेल्या झाडांऐवजी दुसरीकडे वृक्षारोपण म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. असे वृक्षारोपण झालेली झाडे नंतर जगले की वाचले यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सक्षम नाही, असेही बाजपेयी यांनी म्हटले आहे. 

पर्यावरणवाद्यांचा विरोध होऊ लागल्याने नागपूर महानगरपालिकेने या विषयावर आक्षेप मागितले आहेत. सद्यःस्थितीत ही प्रक्रिया सुरू आहे. विकास करण्याला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण हे करताना पर्यावरणाचा नाश होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. नितीन गडकरींनी आज सांगितल्याप्रमाणे झाडे वाचविली जाणार असतील आणि कापल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात अधिक झाडांची लागवड यशस्वीपणे केली जाणार असेल, तर अडचण येणार नाही आणि महत्वाचे म्हणजे पर्यावरणवाद्यांचे समाधान यावर झाले पाहिजे, तरच प्रकल्पाचे काम होऊ शकेल. अन्यथा या प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com