भारताचे योगविज्ञान आणि प्राणायाम संपूर्ण जगात वाखाणले गेले आहे... - indias yoga and pranayam have been praised all over the world | Politics Marathi News - Sarkarnama

भारताचे योगविज्ञान आणि प्राणायाम संपूर्ण जगात वाखाणले गेले आहे...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 19 मे 2021

संकटाचा आयाम, स्वरूप बदलते तेव्हा त्याची तीव्रताही बदलत असते. त्यावेळी त्याचे उपायही बदलणारच आहेत. समयानुकूल संकटांवर मात करण्याचा मार्ग समाजाला दाखवणे हे नेतृत्वाचे काम आहे.

नागपूर : भारताचे योगविज्ञान आणि प्राणायाम संपूर्ण जगात वाखाणले गेले आहे. मी स्वत: रोज प्राणायाम करून याचा अनुभव घेत आहे. इन्फेक्शनवर प्राणायाम हा मोठा उपाय आहे. Pranayama is a great remedy for infections योगविज्ञान आणि प्राणायाम प्रकृतीसाठी उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. आमची मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, आमचा धर्म व कर्तव्यासोबत जोडलेली विचारधारा हे निश्चित आमच्यासाठी अनुकरणीय आहे. ही जीवनमूल्ये आम्हाला संस्कृतीपासून, रामायण, महाभारतापासून मिळाली आहेत. We have got these values of life from culture, Ramayana, Mahabharata त्या भारतीय संस्कृती, इतिहासापासून प्रेरणा घेऊन आम्ही काम करीत आहोत. त्या आधारावर ज्ञानविज्ञान तंत्रज्ञानाची जोड देऊन By adding science technologyआम्ही विश्वगुरू बनण्याचा संकल्प करीत आहोत, असे केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari म्हणाले.

कोरोनाचे संकट वैश्विक आहे. संकटाच्या या काळात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून कुणाचे प्राण जाऊ नये, यासाठी विदर्भात तालुका, नगर परिषद क्षेत्र तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करणार आहोत. धर्मादाय संस्था, सहकारी संस्था, सामाजिक संस्थांना ५-५ कॉन्सन्ट्रेटर देऊन प्रशिक्षणही देणार आहोत. त्यामुळे लोकांचे जीव वाचतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. वैज्ञानिक आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू असे ६००वर मान्यवर यांच्याशी आभासी कार्यक्रमात गडकरी संवाद साधत होते. 

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, संकट कोणतेही असले तरी त्याचा सामना करावा लागतो आणि त्यावर विजयही मिळवावा लागतो. कोरोनाविरुध्दची आपण लढत असलेली लढाई समाजहितासाठी असलेली लढाई आहे. या संकटामुळेच आरोग्य सुविधांवर अधिक काम करण्याची गरज असल्याचे आपल्याला कळले. ५० पेक्षा अधिक रुग्णशय्या असलेल्या प्रत्येक हॉस्पिटलने स्वत:चे ऑक्सिजन घेणारे प्लांट निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्हा हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनला पाहिजे. हवेतून निर्माण होणारे ऑक्सीजनचे प्लांट प्रत्येक रुग्णालयात असले पाहिजे, ही आजही गरज आहे.

हवेतून निर्माण करण्यात येणा‍ऱ्या ऑक्सिजनसाठी विशेष तंत्रज्ञान आहे. तसेच ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आम्हाला आयात करावा लागतो. विद्यापीठांनी यावर संशोधन करून आयातीसाठी पर्याय निर्माण करावा व या क्षेत्रातही देशाला आत्मनिर्भर करावे असे सांगताना गडकरी म्हणाले, तालुका व नगर परिषदेच्या क्षेत्रात धार्मिक, सामाजिक व सहकारी संस्थांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बँक बनवावी. रेमडेसिव्हिरचा तुटवडा लक्षात घेता आपण वर्धा येथून या इंजेक्शनची निर्मिती सुरू केली आहे. याप्रकरणी मनसुख मांडवीय यांची मोलाची मदत झाल्याचा उल्लेख गडकरींनी केला. तसेच ब्लॅक फंगल इन्फेक्शनसाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनची निर्मितीही वर्धेतून लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी व दुर्गम भागात राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळातर्फे मिळालेल्या अ‍ॅम्ब्युलन्स वितरित केल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा : लस घेतल्यास वंध्यत्व येईल, मृत्यू होण्याची भीती; गडचिरोलीत लसीकरण केंद्र ओस 

संकटाचा आयाम, स्वरूप बदलते तेव्हा त्याची तीव्रताही बदलत असते. त्यावेळी त्याचे उपायही बदलणारच आहेत. समयानुकूल संकटांवर मात करण्याचा मार्ग समाजाला दाखवणे हे नेतृत्वाचे काम आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शक असलेल्यांच्या चिंतनातूनच यावर मार्ग निघेल. स्वदेशी विचार हा आमचा आत्मा आहे. त्या आधारावरच हिंदुस्थानला पुढे न्यायचे आहे. सकारात्मकता, आत्मविश्वास समाजात निर्माण करायचा आहे. तसेच संकटांचा सामना करण्याची हिंमत समाजात निर्माण करायची आहे, असेही ते म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख