उपराजधानीत लॉकडाऊन वाढवले, आता ३१ मार्चपर्यंत राहणार कडक निर्बंध

येथे घेतलेले नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. जेणेकरून नागपुरात फोफावत असलेला कोरोनाचा हा कोणता प्रकार आहे आणि कोठून आला आहे. पण दिल्लीच्या प्रयोगशाळेतून तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत कोरोनाचा धोका जास्त आहे.
Corona Nagpur Ziro Mile
Corona Nagpur Ziro Mile

नागपूर : १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत नागपुरात लॉकडाऊन करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. पण कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले.

कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनसंदर्भात आढावा घेण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित होते. तर गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार कृपाल तुमाने व्हीसीद्वारे उपस्थित होते. याशिवाय शहरातील आमदारही बैठकीला होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, १५ मार्चला कोरोना बाधितांचा आकडा २००० च्या जवळपास होता. तो आज ३३०० च्या जवळपास पोहोचला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मृतकांची संख्याही वाढत आहे. राज्यात ५० मृत्यू झाले असताना त्यांतील ३० एकट्या नागपुरातील आहे. परिणामी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नमुन्यांचा अहवाल मिळाला नाही
येथे घेतलेले नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. जेणेकरून नागपुरात फोफावत असलेला कोरोनाचा हा कोणता प्रकार आहे आणि कोठून आला आहे. पण दिल्लीच्या प्रयोगशाळेतून तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत कोरोनाचा धोका जास्त आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विनंती केली आहे की, त्यांनी तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळवून द्यावा. त्यावर येत्या दोन दिवसांत अहवाल मागवण्याची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.   

गृहविलगीकरणातील रुग्ण वाढवताहेत प्रादुर्भाव
गृहविलगीकरणात असलेले कोरोनाचे रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. आधी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन कामाला लागले असून गृहविलगीकरणात असलेले लोक रस्त्यांवर फिरताना आढळल्यास त्यांची रवानगी थेट शासकीय विलगीकरण केंद्रात करण्यात येणार आहे. लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून स्वतःच नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com