Anil Deshmukh
Anil Deshmukh

अनिल देशमुखांच्या मुंबई, नागपूर व काटोलच्या मालमत्तेवर आयकर विभागाच्या धाडी...

अनिल देशमुखांच्या मालमत्तेवरील धाडसत्र ठरावीक दिवसांच्या अंतराने सुरूच आहेत. मागील महिन्यात त्यांच्या फेरीनजीक असलेल्या कॉलेजवर ईडीने धाड घातली होती.

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि काटोलचे आमदार अनिल देशमुख Former Home Minister and Katol's MLA Anil Deshmukh यांना दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीये. त्यांच्या मुंबई व नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथील घर आणि नागपुरातील घर व हॉटेलवर आयकर विभागाने आज धाडी घातल्या. Income Tax Department Raids.

अनिल देशमुखांच्या मालमत्तेवरील धाडसत्र ठरावीक दिवसांच्या अंतराने सुरूच आहेत. मागील महिन्यात त्यांच्या फेरीनजीक असलेल्या कॉलेजवर ईडीने धाड घातली होती. त्यांनी सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही त्यांना दिलासा मिळालेला नाही. उलट त्यांच्यावर आरोप असलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणा त्यांच्या भोवताली आणखी घट्ट फास आवळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या विरोधात आता ईडीने लुकआउट नोटीस जारी केल्याच्या बातम्याही वेगाने पसरत आहेत. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. 

देशमुख यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस बजावली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता त्यांना देश सोडून जाता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. 

ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहे. मात्र, देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी ईडीने केली आहे. पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या आधी परमबीरसिंह यांच्या विरोधातही ठाणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली आहे. देशमुख यांच्या नोटिशी संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नोटीस बजावली नसल्याचे म्हटले आहे.   

दरम्यान, देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल दोन आठवड्यांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने सीबीआयचे उपनिरीक्षकाला अटक केली आहे. हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टिमने तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले होते. त्यामुळे तिवारी आणि डागा यांना दिल्लीला नेण्यात आले होते. आता आयकर विभागाच्या धाडसत्रानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com