"त्या' हनीट्रॅप ऑडिओ क्‍लिपची चौकशी करा : फडणविसांची मागणी 

ऑडीओ क्‍लीपमध्ये जो साहिल सैय्यद बोलत असल्याचे महापौर जोशींनी काल सांगितले. तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता असल्याचे सांगण्यात येते. या क्‍लिपचा थेट संबंध महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर जोशी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाशी जोडला जात आहे.
Devendra Fadanvis-Anil Deshmukh
Devendra Fadanvis-Anil Deshmukh

नागपूर : नागपुरचे महापौर संदीप जोशी आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना "हनी ट्रॅप'मध्ये अडकविण्याबाबतचे संभाषण असलेली ऑडीओ क्‍लीप व्हायरल झाली आहे. त्यामुळे महापालिकेसह उपराजधानीत खळबळ उडाली. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी "त्या' कथित हनीट्रॅप ऑडिओ क्‍लिपची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे. विशेष म्हणजे या क्‍लिपमध्ये साहिल सैय्यद नामक व्यक्ती त्याच्या पंटरसोबत बोलत असल्याचे महापौर जोशी यांनी काल सांगितले. या साहिलच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. 

गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, "विविध समाजमाधमांमध्ये सध्या एक दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्‍पिप व्हायरल झाली असून, त्यातून अनेक गंभीर बाबी निदर्शनास येत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हनिट्रॅप करण्यासंदर्भातील गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन त्यांच्या आशिर्वादाने गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचाही उल्लेख आहे. ज्या न्यायव्यवस्थेकडे आपण अतिशय पवित्र नजरेने पाहतो, ती न्यायव्यवस्था मॅनेज करण्यासंदर्भातील उल्लेख आहे. अतिशय गंभीर उल्लेख यात असल्याने या ऑडिओ क्‍लिपची वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन त्यातील सत्य जनतेपुढे मांडण्याची गरज आहे.' 

या ऑडिओ क्‍लिपची चौकशी झाल्यास अनेक तथ्य उघड होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गृहमंत्री उच्चस्तरीय चौकशीचे आदेश या प्रकरणी देतील, असा विश्‍वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या ऑडीओ क्‍लीपमध्ये जो साहिल सैय्यद बोलत असल्याचे महापौर जोशींनी काल सांगितले. तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता असल्याचे सांगण्यात येते. या क्‍लिपचा थेट संबंध महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर जोशी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाशी जोडला जात आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या वेगवान घडामोडींमुळे हा संघर्ष भविष्यात आणखी पेटणार, असे दिसते. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या मागणीवरुन गृहमंत्री चौकशी करतात का आणि चौकशीत काय बाहेर येणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com