अफवांकडे दुर्लक्ष करा, शिवशंकरभाऊ पाटलांची प्रकृती स्थिर…
Shivshankarbhau Patil Shegaon

अफवांकडे दुर्लक्ष करा, शिवशंकरभाऊ पाटलांची प्रकृती स्थिर…

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. 'मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका..', असे त्यांनी कुटुंबीयांना सांगून ठेवले आहे.

शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज शेगाव Shri Sant Gajanan Maharaj Sansthan Shegaon संस्थानचे विश्वस्त ८३ वर्षीय शिवशंकरभाऊ पाटील Shivshankarbhau Patil यांच्या प्रकृतीबद्दल अनेक जणांकडून चौकशी केली जात आहे. काही ठिकाणी उलटसुलट माहितीही पसरवली जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. पण आता प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे नातू हरिभाऊ पाटील Haribhau Patil यांनी सांगितले. 

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून मल्टीऑर्गन फेलीवरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. 'मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका..', असे त्यांनी कुटुंबीयांना सांगून ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानुसारच त्यांच्यावर घरीच पूर्ण मेडिकल सेटअपसह ट्रीटमेंट सुरू आहे. एम डी मेडिसिन डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांची चमू त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांचा रक्तदाब कमी झालेला असून ऑक्सिजनही लावण्यात आलेला आहे. 

शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात बुलडाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही शेगावला बोलविण्यात आल्याची माहिती आहे. सध्यातरी शिवशंकरभाऊ यांची तब्बेत स्थिर असून त्यांच्यासंदर्भात कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. हृदयविकार असल्याने डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करीत आहेत. दरम्यान काही लोकांना त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट माहिती प्रसारित केली होती. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या लोकांना संबंधितांना विचारणा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

एक कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊ पाटील यांच्या ख्याती सर्वदूर आहे. त्यांच्या मार्गदर्शनात शेगाव संस्थानचे व्यवस्थापन गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत सुरळीत सुरू आहे. शेगाव संस्थानचे समाजकार्य मोठे आहे. त्यांनी आतापर्यंत समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविले. आनंद सागर हा भव्य प्रकल्प त्यांच्याच नेतृत्वात यशस्वीपणे राबविण्यात आला. नंतर नंतर काही तांत्रिक अडचणीमुळे आनंद सागर बंद पडले. पण संस्थानतर्फे सुरू असलेले इतर उपक्रम आजही यशस्वीपणे सुरू आहेत. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in