चिखलदऱ्याच्या स्कायवॉकलाही बाळासाहेबांचे नाव द्या, पण काम लवकर पूर्ण करा...

स्कायवॉकचे काम आधी पोलीस दलाच्या वायरलेस यंत्रणेकडून आक्षेप घेत अडविले गेले आणि कित्येक दिवस ते बंदच होते. त्या कचाट्यातून ते कसेबसे सुटले. अन् आता ते वन विभागांतर्गत येणाऱ्या वन व वन्य जीव मंडळाच्या कचाट्यात अडकलेले आहे.
चिखलदऱ्याच्या स्कायवॉकलाही बाळासाहेबांचे नाव द्या, पण काम लवकर पूर्ण करा...
Aditya Thackeray - Navnit Rana

अमरावती : महाराष्ट्रात विदर्भ आहे आणि विदर्भातील अप्रतिम सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे मेळघाटमधील चिखलदरा. Chikhaldara चिखलदरा म्हणजे विदर्भातील जनतेसाठी थंड हवेचे ठिकाण. Hill Station चिखलदऱ्याबद्दल सविस्तर वर्णन करण्याचे कारण की, आधीच्या सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रिपदे विदर्भाकडे होती. विदर्भाचा विकास जलदगतीने होत असल्याची भावना होती. आज ही भावना दिसत नाही. पाहिजे तर या स्कायवॉकलाही स्व. बाळासाहेब ठाकरेंचे Balasaheb Thackeray नाव द्या, पण हे काम लवकर पूर्ण करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा MP Navnit Rana यांनी पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांना केली आहे. तसे पत्रही खासदार राणा यांनी दिले आहे. 

एकतर विदर्भाकडे महत्त्वाची खाती नाहीत आणि आपल्यासह विदर्भाबाहेरचे काही अपवाद वगळता बहुतेक मंत्री विदर्भात फारसे येतही नाहीत. चिखलदऱ्याला हजारो पर्यटक दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सिडकोकडून त्याची उभारणी केली जात आहे. गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट दरम्यान ४०७ मीटर लांबीच्या या स्कायवॉकच्या उभारणीवर ३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. जून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण त्याचे काम आज अर्धवट पडलेले आहे. या स्कायवॉकवर उभे राहून पर्यटकांना चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळता येईल. त्यावर असलेल्या काचेच्या प्लटफॉर्मवर उभे राहून ५०० फूट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे.

पत्रात खासदार राणा म्हणतात, ‘आदित्यजी! आपण राज्याचे पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. हा स्कायवॉकही लवकरात लवकर पूर्ण होणार असेल आणि विदर्भाच्या पर्यटन व्यवसायास चालला मिळणार असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे आजोळ असल्यामुळे या कामात आपण स्वतः लक्ष्य देऊन या कामालाही गती द्यावी. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे या स्कायवॉकला माननीय शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यायला आमची काहीही हरकत असणार नाही.

स्कायवॉकचे काम आधी पोलीस दलाच्या वायरलेस यंत्रणेकडून आक्षेप घेत अडविले गेले आणि कित्येक दिवस ते बंदच होते. त्या कचाट्यातून ते कसेबसे सुटले. अन् आता ते वन विभागांतर्गत येणाऱ्या वन व वन्य जीव मंडळाच्या कचाट्यात अडकलेले आहे. वनखाते सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे वडिलांकडे हट्ट धरून आपण हे काम मार्गी लावू शकता. हा स्कायवॉक चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा टर्निंग पॉइंट ठरेल. त्यामुळे अशा या स्कायवॉकचे काम पर्यटन मंत्री म्हणून आपण लवकरात लवकर पूर्ण करून आदिवासीबहुल मेळघाट, चिखलदऱ्याला न्याय दयाल आणि तेथील गोरगरीब आदिवासींना वाढणाऱ्या पर्यटनातून रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून द्याल, अशी अपेक्षा आहे.’
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in