तपासाला बोलवाल तर परवानगी घ्या, परमबीर सिंह यांनी काढले होते आदेश... 

या प्रकरणात तक्रारदार राजेश शहा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे तक्रार करून तपास अपूर्ण झाल्याची माहिती दिली होती. परंतु तेव्हा कोणतीच कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल केली होती. त्याची अद्यापही सुनावणी झाली नाही.
Parambir Sing
Parambir Sing

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्या गैरकारभाराचे दररोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहे. यांपैकीच एक म्हणजे भाईंदरचा यूएलसी घोटाळासुध्दा (Bhainder's ULC scam too) एक आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलवायचे असेल, तर त्याची परवानगी सीपी ऑफिसमधून (Commissioner Office) घ्यावी, असे आदेश तेव्हा काढण्यात आले होते. इतकेच नाही तर कोणत्याही आरोपीला अटक करायची असेल तरीसुद्धा परवानगी घेण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले होते. आता हा आदेश पुढे आल्याने परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.
 

भाईंदर येथील सर्व्हे क्र. ६६३ व ६६४ या भूखंडावरील गैरव्यवहाराबाबत ठाणेनगर पोलिस स्टेशनला २६ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यूसीएलचे बनावट बिगरशेती प्रमाणपत्र बनवून आणि कसल्याही कोर्ट फी, स्टँप डयुटी, आवक-जावक नोंदीशिवाय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामे करताना बिल्डरांनी सरकारचा अब्जावधींचा महसूल बुडविला होता. या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे यांच्यासह केवळ ५ बिल्डर्सना अटक करण्यात आली होती. अन्य सरकारी अधिकारी व जवळपास २० बिल्डर्सचे केवळ बयाण नोंदवीत त्यांना साक्षीदार करण्यात आले. ठाणे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी कोट्यवधी रुपये लुटले, असा आरोप तक्रारदार राजेश शहा यांनी केला. 

या प्रकरणाचा संपूर्ण तपास न करता ३१ मार्च २०१७ रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्याबाबत लोकायुक्तांकडे दिलेल्या तक्रारीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याबाबतही कार्यवाही करण्यात आली नाही, असा सुध्दा राजेश शहा यांचा आरोप आहे. दरम्यान पाच वर्षापूर्वी दाखल असलेल्या या घोटाळ्याचा फेरतपास करावा, अशी मागणी राजेश शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे यांना निवेदन देऊन केली आहे. या प्रकरणाचा तपास करताना परमबीर सिंग यांचा तपास अधिकारी भारत शेळके यांच्यावर आरोपी अटक करण्यासंदर्भात दबाव होता असा दावा राजेश शहा यांनी केला होता. 

या प्रकरणात कोणत्याही आरोपीची चौकशी किंवा अटक करायची असले तर पोलिस आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी, असे लेखी आदेश काढण्यात आले होते. हे आता समोर आले आहे. १५ मार्च २०१७ ला ठाण्याचे तत्कालीन अपर पोलिस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे यांच्या सहीनिशी हा आदेश काढला होता आणि त्याची प्रत आता समोर आली आहे. यावरून राजेश शहा यांनी तपास अधिकारी भारत शेळके यांच्यावर परमबीर सिंग यांचा दबाव होता, हे स्पष्ट होत आहे. तसेच शहा यांनी या प्रकरणात परमबीर सिंग यांनी आरोपींना वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये उकळले, असा जो आरोप केला आहे, त्याला कुठे तरी दुजोरा मिळत आहे. यामुळे आधीच अडचणीत सापडलेले परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. 

या प्रकरणात तक्रारदार राजेश शहा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे तक्रार करून तपास अपूर्ण झाल्याची माहिती दिली होती. परंतु तेव्हा कोणतीच कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल केली होती. त्याची अद्यापही सुनावणी झाली नाही, हे विशेष.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com