पटोले आणि वडेट्टीवार खरे ओबीसी नेते असतील, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे…

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नसेल, तर उग्र आंदोलनाचा मार्ग निवडणार असल्याचेही संजय कुटे यांनी आज येथे सांगितले.
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

भंडारा : महाविकास आघाडी सरकारने आपल्या चुकांमुळे ओबीसींचे आरक्षण OBC Reservation घालविले आहे. हा विषय राज्य सरकारला हाताळताच आला नाही. त्यामुळे आज ओबीसींचे हे हाल सुरू आहेत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार Vijay wadettiwar आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State Congress President Nana Patole हे जर खरे ओबीसी नेते असतील, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि आमच्या २६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हान ओबीसी खात्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे Sanjay Kute यांनी दिले आहे. 

भंडारा येथे पक्षाच्या बैठकीसाठी आले असताना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय कुटे म्हणाले, पटोले आणि वडेट्टीवार यांना सत्तेची लालसा सुटत नसेल आणि ओबीसींसाठी काही करायचेही नसेल, तर त्यांनी आम्हाला शासकीय अधिकार द्यावे. आम्ही केवळ तीन महिन्यांत ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून देऊ. ओबीसींचे नेते म्हणून घेणारे पटोले आणि वडेट्टीवार यांना सत्तेमध्ये कुणी मोजत नाही, त्यामुळेच ते आज हतबल झालेले दिसतात. आता ओबीसी नेते असल्याचा आव आणण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही उरलेले नाही, असा शब्दांत त्यांनी विदर्भाच्या या नेत्यांवर निशाणा साधला. 

सत्ता नको, शासकीय अधिकार द्या..
येत्या २६ जूनला भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आणि ओबीसींचा संताप रस्त्यावर दिसणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी मी सहकाऱ्यांसह आज येथे आलो आहे. वडेट्टीवार आणि पटोले यांना सत्तेत राहायचेच असेल तर आम्ही भाजपचे चार लोक जे ओबीसींसाठी लढतो आहे आणि गेल्या सरकारमध्ये ओबीसी खात्याचा कारभार पाहिला आहे. आम्हाला शासकीय अधिकार द्यावे. त्यानंतर आम्ही तीन महिन्यांत ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करून देतो, असे संजय कुटे यांनी ठणकावून सांगितले. 

ओबीसी बांधवांच्या  बाबतीत जर आपण हतबल झाला असाल, तर तसाही सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. आमच्या २६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनानंतर आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत आणि तेथे तीन महिन्यांच्या आत ओबीसींचा इम्पेरिकल डाटा तयार करण्याची मागणी लावून धरणार आहोत. त्यानंतरही ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नसेल, तर उग्र आंदोलनाचा मार्ग निवडणार असल्याचेही संजय कुटे यांनी आज येथे सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com