लोकमान्य असते तर म्हणाले असते, ‘सरकार ठिकाणावर आहे का?’

नाना पटोले विदर्भाचे आहेत. त्यांनी तरी नागपुरात अधिवेशन घेण्याची भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु त्यांची ना-ना सुरू आहे. मुख्यमंत्री मुंबईचे तर उपमुख्यमंत्री पुण्याचे. त्यामुळे विदर्भात त्यांनी अजून पायही ठेवला नाही. हिवाळी अधिवेशन टाळायचा प्रयत्न जर सरकारने केला तर त्यांच्या तुटून पडू.
Sudhir Mungatiwar
Sudhir Mungatiwar

नागपूर : सत्तेसाठी ‘कुछ भी’ करणाऱ्या लोकांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त आम्ही त्यांच्या जनहितविरोधी धोरणाचा आढावा घेत आहोत. या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहोत. फडणवीसांचे सरकार गेले अन् फसवणुकीचे सरकार आले. लोकमान्य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा अग्रलेख लिहिला होता. आज ते असते तर ‘सरकार ठिकाणावर आहे काय?’, असा अग्रलेख लिहिला असता, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

आज पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर जोरदार प्रहार केले. मुनगंटीवार म्हणाले, आजपासून आम्ही सरकारला जाब विचारणे सुरू केले आहे. हे सूड घेणारे सरकार आहे. १ मे १९६० ला यशवंतराव चव्हाण यांनी मंगलराज आणले, पण शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने जंगलराज आणले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर्कसंगत निर्णय घ्यायचे असतात. या सरकारच्या जेवढ्याही बैठका झाल्या, त्यात तर्कशून्य निर्णय झालेले आहेत. या सरकारने ४३ मंत्री बनविले. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आहेत. पण कामाच्या नावावर भोपळा आहेत. 

लढणारे नाही, रडणारे सरकार
सरकारच्या राज्य सूचित ६६ विषय असतात. या विषयावर काम करून निर्णय घ्यायचे असतात. पण असे काहीच होत नाहीये. कुठलीही समस्या यांच्या समोर आली की, पैसा नाही, केंद्र सरकार मदत करत नाही, असे सतत रडगाणे गातात. अरे रडत काय बसता, लढा ना, रडणारे नाही तर लढणारे बना. कोरोनाचे संकट आल्यानंतर एकट्या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे उत्पन्न कमी झाले. इतरही राज्याचे मुख्यमंत्री कारभार चालवीत आहेत. पण आपल्या मुख्यमंत्र्यांसारखे रडत नाहीत. नेहमी नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवून सरकार चालत नसते, असे श्री मुनगंटीवार म्हणाले. 

कोरोनाचा अजब फंडा
नागपुरात यायची सरकारला भिती वाटली. त्यामुळे मुंबईतच अधिवेशन घेऊ, असं सांगण्यात आलं. पण आता ७ डिसेंबरला अधिवेशन सुरू होणार नाही, अशा हालचाली सुरू आहेत. हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचे कारस्थान रचले जात असल्याची माहिती आहे. या सगळ्यासाठी कोरोनाचे कारण पुढे केले जात आहे. म्हणजे जसं काही कोरोना यांच्याशी बोलला की, नागपुरात अधिवेशन घ्याल तर मी येईन आणि मुंबईत घ्याल तर मी तुमच्या वाटी जाणार नाही. काहीही बोलणे, काहीही करणे, यामुळे या सरकारवरील जनतेचा विश्‍वास उडाला आहे. नाना पटोले विदर्भाचे आहेत. त्यांनी तरी नागपुरात अधिवेशन घेण्याची भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु त्यांची ना-ना सुरू आहे. मुख्यमंत्री मुंबईचे तर उपमुख्यमंत्री पुण्याचे. त्यामुळे विदर्भात त्यांनी अजून पायही ठेवला नाही. हिवाळी अधिवेशन टाळायचा प्रयत्न जर सरकारने केला तर त्यांच्या तुटून पडू, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. 

पत्रकार परिषदेला पदवीधर मतदार संघाचे उमेदवार महापौर संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार गिरीष व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार समीर मेघे, खासदार डॉ. विकास महात्मे आणि चंदन गोस्वामी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com