मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन… - i will definitely go if called by chief minister and deputy chief minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन…

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

महाराष्ट्रात सुडबुद्धीचे राजकरण केले जात नाही. सर्व पक्ष आपआपल्या विभागांच्या भल्याचा विचार करून एकत्र येतात आणि आपली भूमिका ठरवतात. उद्वव ठाकरे यांनी भाजपसोबत न जाण्याचे मत मांडले आहे.

नागपूर : ‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, हे वक्तव्य मी केले. तेव्हापासून महाआघाडीत धुसफुस सुरू असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. त्यावरून अजितदादांना Dupty Chief Minister Ajit Pawar नाराजीचा सूर काढल्याचेही काही जण सांगतात. पण प्रत्यक्षात तसे काहीच नाही आणि यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray किंवा अजितदादांनी मला बोलावले तर नक्कीच त्यांना भेटायला जाईन, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress Nana Patole आज येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. 

नाना म्हणाले, मी जे वक्तव्य केले आणि त्यात काही पाप नाही. आमचे टारगेट भाजप आहे. भाजप देश विकायला निघाला आहे. त्यांच्या विरोधात आमची लढाई आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी या चर्चांना काही अर्थ नाही. त्यांना करायच्या असतील, तर त्यांनी खुशाल कराव्या. राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची काही नाराजी असेलही तर ती दूर करण्यात येईल. कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद आहे. 

राज्यात पक्षाचा प्रमुख म्हणून मी काम करतो आहे. आता कार्यकर्ते आशावादी आहेत. पक्ष एक झाला आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीत जाऊन आले. ते विभागाच्या बैठकीसाठी गेले होते आणि नितीन राऊत अनुसूचित जाति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामासाठी ते नियमीत दिल्लीला जात असतात. त्यामुळे त्यांच्या दिल्लीवारीचा वेगळा अर्थ काढण्याची अजिबात गरज नाही.  

आमच्याजवळही अनेक भास्करजाधव आहेत...
पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्यानंतर आमदार भास्कर जाधव अचानक प्रकाशझोतात आहे. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. हे करताना शिवसेनेकडे असलेले वनमंत्रीपद कॉंग्रेसला देण्याबाबतही ते बोलले. त्यावर आमच्याजवळही अनेक भास्करजाधव आहेत. महाविकास आघाडीत ठरलेल्या सूत्रानुसार विधानसभेचे अध्यक्षपद आमच्याकडे आहे आणि ठरल्यानुसार ते राहणारच असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 

...तर पहिल्याच दिवशी मंत्रिपद घेतलं असतं !
मला मंत्रिपदच घ्यायच असतं, तर पहिल्याच दिवशी घेतलं असत. दबाव टाकून किंवा सौदे करून राजकरण मी कधीच केले नाही. मी राजकीय व्यापारी नाही. सामान्य परिवारातून पुढे आलेलो असल्यामुळे व्यावसायीक राजकारण मला कळतही नाही, असे सांगताना त्यांनी चिनबद्दलही काळजी व्यक्त केली. उद्या चिनने हमला केला तर आपण कुठे राहू. याची काळजी प्रत्येक देशवासीयाने आज केली पाहिजे. मोदींमुळे देश विकला जात आहे. आता चिनच्या हमल्याची भिती आहे आणि हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत असल्याचेही नाना म्हणाले. 

हेही वाचा : भाजप शिवसेना एकत्र येणार का?, त्यावर नारायण राणे म्हणाले...

सुडबुद्धीचे राजकारण नाही... 
महाराष्ट्रात सुडबुद्धीचे राजकरण केले जात नाही. सर्व पक्ष आपआपल्या विभागांच्या भल्याचा विचार करून एकत्र येतात आणि आपली भूमिका ठरवतात. उद्वव ठाकरे यांनी भाजपसोबत न जाण्याचे मत मांडले आहे. त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होतो, तो आमचा विषय नाही. पण शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, हे आमचे मत आहे. आमची समन्वय समिती आहे आणि समितीमध्ये उत्तम समन्वय आहे. आम्ही देशभर महागाईच्या विरोधात आंदोलन करत आहोत. त्यासाठी आमचे वरिष्ठ राज्यात आले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये कुठलीही गॅप नाही. हे सरकार ५ वर्ष चालेल, यात दुमत असण्याचे काहीही कारण नाही, असेही पटोले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख