गृहमंत्र्यांनी थोपटली एकनाथांची पाठ, पोलिस दलाचा उत्साह वाढला… - home minister slaps eknaths back police force gets excited | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्र्यांनी थोपटली एकनाथांची पाठ, पोलिस दलाचा उत्साह वाढला…

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

मुंबईला पाकव्याप्त काश्‍मीर म्हणणाऱ्यांनाही समाजानेच त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. समाज एकत्र होईल, तेव्हाच कुठे अशा प्रवृत्तींना आळा घालता येईल. त्यामुळे ही जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाने उचलण्याची वेळ आली आहे.

नागपूर : पोलिस दलातील वाहतूक शाखेतील हवालदार एकनाथ पार्टे कर्तव्य बजावत असताना एका महिलेने त्यांना भर रस्त्यावर मारहाण केली. पण त्याही परिस्थितीत एकनाथांनी संयम ढळू न देता धैर्याने परिस्थिती हाताळली. या त्यांच्या हिंमतीबद्दल अनेकांनी त्यांना ‘हॅट्स ऑफ’ केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एकनाथ पार्टे यांचा सत्कार करुन त्यांच्यासह पोलिस दलाचा उत्साह वाढवला.

त्यांचा सत्कार करताना गृहमंत्री म्हणाले, कर्तव्य बजावत असताना एकनाथ यांना मारहाण झाली, ही बाब अतिषय निषेधार्थ आहे. पोलिस हा सुद्धा माणूस असतो. त्यांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने पोलीसांना समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यापूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पोलिसांची बाजू उजलून धरली होती. ते म्हणाले होते की पोलिसविरोधी अशा प्रवृत्तीवर समाजानेच बहिष्कार घातला पाहिजे. पोलीसाला मारहाण होत असताना बघणाऱ्या लोकांनी शांत बसायला नको होते. मुळातच एकनाथ यांनी त्यांना शिवीगाळ केलीच नव्हती. ते सच्चे होते म्हणूनच संयम पाळू शकले. 

पोलिसांना मारहाण करणारे आणि मुंबई पोलीसांची अब्रू काढणाऱ्यांना आता जनतेनेच धडा शिकविला पाहीजे, असेही संजय राऊत म्हणाले. मुंबईला पाकव्याप्त काश्‍मीर म्हणणाऱ्यांनाही समाजानेच त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. समाज एकत्र होईल, तेव्हाच कुठे अशा प्रवृत्तींना आळा घालता येईल. त्यामुळे ही जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाने उचलण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.       (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख