भास्कर जाधवांना पोलिस संरक्षणाची गृहमंत्र्यांची हमी

सोमवारी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त आणि मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून अशा प्रकारचा त्रास देणाऱ्यांची माहिती गृहमंत्र्यांनी घेतली. चित्रपटसृष्टीतील लोकांकडून खंडणी उकळणे, त्यांचा छळ करणे, या बाबी हानिकारक आहेत.
Bhaskar Jadhav - Dilip Walse Patil.
Bhaskar Jadhav - Dilip Walse Patil.

नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेलमध्ये येऊन गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित 12 MLA's Suspended करण्यात आले. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांना समाजमाध्यमांमधून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Home Minister Dilip Walse Patil यांनी आज सभागृहात सांगितले.

आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत गृह विभागाशी संबंधित मुद्द्य़ांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहास माहिती दिली. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे फोन टॅप होत असल्याचे सभागृहात सांगितले. ही बाब अतिशय गंभीर आहे. कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करण्यासाठी विशिष्ट कायद्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागते. फोन नंबर द्यावे लागतात. मात्र दुसऱ्याच व्यक्तीचे नाव देऊन नाना पटोले यांचा फोन टॅप झाला असेल तर याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल व याप्रकरणी जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पुढील अधिवेशनात चौकशीतून समोर आलेली वस्तुस्थिती सभागृहात मांडण्यात येईल, असे गृहमंत्री म्हणाले. ज्येष्ठ कला दिग्दर्शक श्री. राजू सापते यांच्या आत्महत्या प्रकरणावरही गृहमंत्र्यांनी भाष्य केले. सापते यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. लेबर युनियनचे काही पदाधिकारी त्यांना त्रास देत असल्याबाबतचा उल्लेख या व्हिडिओत त्यांनी केला होता. 

यासंदर्भात सोमवारी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त आणि मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून अशा प्रकारचा त्रास देणाऱ्यांची माहिती गृहमंत्र्यांनी घेतली. चित्रपटसृष्टीतील लोकांकडून खंडणी उकळणे, त्यांचा छळ करणे, या बाबी हानिकारक आहेत. याबाबत उद्या गृहमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जाईल. पुढील कार्यवाहीचे निर्देश दिलेले असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सभागृहास सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com