गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, गणेशोत्सवात भपकेबाजी टाळा ! 

गणपती मंडपामध्ये निर्जंतूकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता यासंदर्भातील नियमांचे पालन करावे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर : यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखालीच होणार असल्याचे चित्र दिसत आहे. नागपुरात रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याचा ईशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्‍यता लक्षात घेता राज्य सरकारने सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गणेशोत्सवात भपकेबाजी टाळा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणांने साजरा करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात सरकारने 12 कलमी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक मूर्तींवर 4 फुट तर घरगुती मूर्तींच्या उंचीवर 2 फुटांची मर्यादा टाकण्यात आली आहे. मिरवणुकींवरही प्रतिबंध लावण्यात आला आहे. उत्सवादरम्यान भपकेबाजी टाळून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. 

सार्वजनिक मंडळांनी न्यायालयाचे आदेश पाळावे, मनपाच्या धोरणानुसारच मंडप उभारावेत. गणेशोत्सवाची सजावट करताना भपकेबाजी टाळावी. शक्‍यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवराच्या मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्‍यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्‍य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे. श्रींच्या दर्शनाची ऑनलाईन सुविधा करावी. 

गणपती मंडपामध्ये निर्जंतूकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता यासंदर्भातील नियमांचे पालन करावे. आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नयेत. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.       (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com