हिंगणघाटात शिवसेनेने भाजपला दाखवला कात्रजचा घाट.... - in hinganghat shivsena shows bjp katrajs ghat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

हिंगणघाटात शिवसेनेने भाजपला दाखवला कात्रजचा घाट....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 जून 2021

भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सरनाईकांनी ताशेरे ओढले आहेत. याशिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आपली कामे बरोबर करून घेत आहेत.

नागपूर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक Shiv Sena MLA Pratap Sarnaik यांच्या लेटर बाँम्बमुळे Letter Bomb पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजप युती होणार का, याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरूच ठेवली आहे. आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय. Shivsena Challenges BJP गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे. आज याच विदर्भातील हिंगणघाट Hinganghat नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे Chandrakant Ghuse यांच्यासह भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे The Chief Minister Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. 

या नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे. असं असतानाही भाजपचे १० विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. नगरपालिकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, नगरसेवक सतीश ढोबे, सुरेश मुंजेवार, भास्कर थावरी, मनोज वाघमारे, नीता ढोबे, निलेश पोगळे, 
सुनिता पचोरी, संगिता वाघमारे, मनीष देवढे, बंटी वाघमारे ही भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची नावे आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहिले. त्यातून त्यांनी मोठा बॉंब टाकला आहे. भाजपसोबत तुटण्याआधी जुळवून घ्या, असा आमदार सरनाईकांच्या पत्रातील मजकुराचा सूर आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आमच्यामागे लागला आहे. याशिवायही बराच त्रास दिला जात आहे. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी भाजपसोबत जुळवून घ्या, अशी विनंती करणारे पत्र आमदार सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. भाजपसोबत जुळवून घेतल्यास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि पक्षालाही भविष्यात फायदा होईल, असेही पत्रात त्यांनी लिहिले आहे. टॉप सिक्युरिटी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांचा न्यायालयीन लढाही सुरू आहे. मात्र चौकश्‍या थांबविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जुळवून घ्यावे, असे आमदार सरनाईक यांना पत्रात लिहिले आहे. 

हेही वाचा : दोषी नसेल तर पुन्हा जबादारी द्या, माजी मंत्री संजय राठोड यांची मागणी..

आमदार सरनाईक यांनी लिहिलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर आले आणि याची पूर्वकल्पना शिवसेनेच्या नेत्यांना होती, अशीही माहिती प्राप्त होत आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सरनाईकांनी ताशेरे ओढले आहेत. याशिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आपली कामे बरोबर करून घेत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना डावलत असून आपले कार्यकर्ते फोडत असल्याचाही आरोप आमदार सरनाईक यांना पत्रातून केलेला आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख