धक्कादायक : विजेचे बिल आले ४० हजार, अन त्यांनी केली आत्महत्या

शनिवारी दुपारी घरासमोरच अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. कुटुंबीयांनी धावपळ करित आग विझवून तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भरमसाठ बिलाचा धसका आणि अधिकाऱ्यांकडून मिळणारी तुसडेपणाची वागणूक. यामुळे व्यथीत होऊन त्यांनी आत्माहत्या केल्याचे आप्तेष्टांचे म्हणणे आहे.
Mahavitaran
Mahavitaran

नागपूर : एका सामान्य माणसाच्या घराचे वीज बिल किती असावे, याचा अंदाजही न घेता महावितरणकडून विजेची बिले पाठवणे सुरू आहे. रोज कुठे ना कुठे वीज बिलासाठी आंदोलने सुरू आहेत. यशोधरानगर मध्ये राहणारे लीलाधर लक्ष्मण गायधने यांना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४० हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले. बिल पाहताच त्यांना धक्का बसला. वारंवार महावितरण कार्यालयाच्या चकरा मारुनही बिल कमी न केल्यामुळे व्यतिथ होऊन शेवटी त्यांनी मृत्युला कवटाळे. 

लॉकडाउनच्या काळात अवाजवी भरमसाठ वीजबिल पाठविण्यात आल्याची ओरड चांदा ते बांदा सुरू आहे. त्यातच बिल विषयक तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने जनमानस प्रक्षुब्ध आहे. वाढीव बिलाचा महावितरणने दिलेला शॉक आणि दुर्लक्षित कारभारानेच लीलाधर यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या आप्तेष्टांनी सांगितले. शनिवारी यशोधरानगरात घडलेल्या या घटनेने लोकं हळहळले पण तेवढेच संतप्तही झाले. 

लीलाधर यशोधरानगरातील पाहुणे लेआऊटमध्ये राहात होते. त्यांच्या आप्तेष्टांनी दिलेल्या माहितीनुसार, गायधने खासगी काम करायचे. त्यांचे दोन माळ्यांचे स्वतःचे घर आहे. लीलाधर तळमाळ्यावर राहात होते, तर दुसऱ्या मजल्यावर भाडेकरू ठेवले आहेत. त्यांना तब्बल ४० हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले होते. बिलाची रक्कम बघुन त्यांना धक्कच बसला. चुकीने अवाजवी बिल पाठविण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. यामुळे महावितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्यात. वारंवार चकरा मारल्या, अधिकाऱ्यांच्या भेटी घेत विनवण्याही केल्या. पण काडीचाही उपयोग झाला नाही. उलट बिल न भरल्यात वीजपुरवठा खंडीत करण्याचा दम त्यांना भरण्यात आला. 

या प्रकाराने ते कमालीचे व्यथित झाले. या चिंतेतच त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली होती. शनिवारी दुपारी घरासमोरच अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. कुटुंबीयांनी धावपळ करित आग विझवून तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भरमसाठ बिलाचा धसका आणि अधिकाऱ्यांकडून मिळणारी तुसडेपणाची वागणूक. यामुळे व्यथीत होऊन त्यांनी आत्माहत्या केल्याचे आप्तेष्टांचे म्हणणे आहे. तुर्तास यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.    (Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com