रोजे सोडून "तो' 65 कामगारांना घेऊन निघाला गावाकडे, सरकारनेही घेतली दखल 

तो कामगारांना घेऊन आत असताना काल रात्री साडेनऊ वाजता नागपुरातील वर्धा रोड, जामठा येथील दीनबंधुच्या सहायता केंद्रावर थांबला. येथे सर्वांना जेवण मिळत असल्याचे त्याला कळले. त्याने लगेच ट्रकमधील सर्वांना खाली उतरवले. मो. अझीमने श्री गुरूदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वरदादा रक्षक यांची भेट घेतली.
Aziz
Aziz

नागपूर : रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव रोजे ठेवत पवित्र कुराणचे पालन करतात. मात्र, उत्तरप्रदेशातील एका मुस्लिम युवकाने कोरोनामुळे चेन्नईत अडकलेल्या गावकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. आपला रोजा सोडून चेन्नईत अडकलेल्या 65 गावकरी कामगारांसह तो युवक घराकडे निघाला. त्या युवकाचे नाव मोहम्मद अझीम असे आहे. त्याच्या कार्याची दखल उत्तरप्रदेश सरकारहेही घेतली आहे, हे विशेष. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मो. अझीम हा तिशीतील युवक उत्तरप्रदेशातील मुरादाबाद शहराजवळील एका गावात राहतो. मुरादाबाद येथे त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याचे पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू होते. परंतु, आपल्या गावातील 65 कामगार युवक चेन्नईत अडकल्याची माहिती त्याला मिळाली. त्यांची मदत कशी करावी, याबाबत अझीमने विचार केला. दुसऱ्याच दिवशी त्याने स्वतः ट्रकने चेन्नईला जाऊन गावकरी युवकांना गावात आणण्याचा निर्णय घेतला. त्याने आई-वडीलांची परवानगी घेतली आणि एका मित्राला सोबत घेतले आणि निघाला चेन्नईच्या प्रवासाला. 

त्याने घेतलेल्या निर्णयाचे आमदार-खासदारासह सर्वांनी कौतूक केले. मात्र, हे कर्तव्य बजावण्यासाठी त्याला रोजा सोडून द्यावा लागला. गेल्या सहा दिवसांपूर्वीच निघालेला मो. अझीम चेन्नईत पोहचला. त्याने शहरात विविध ठिकाणी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या गावकऱ्यांना एका धार्मिक सभागृहात एकत्र केले. आपल्या गावातील युवक आपल्याला घ्यायला आल्याचे कळताच अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तब्बल 65 युवा कामगारांना ट्रकमध्ये घेऊन अझीम तीन दिवसांपूर्वी चेन्नईतून निघाला. 

तो कामगारांना घेऊन आत असताना काल रात्री साडेनऊ वाजता नागपुरातील वर्धा रोड, जामठा येथील दीनबंधुच्या सहायता केंद्रावर थांबला. येथे सर्वांना जेवण मिळत असल्याचे त्याला कळले. त्याने लगेच ट्रकमधील सर्वांना खाली उतरवले. मो. अझीमने श्री गुरूदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वरदादा रक्षक यांची भेट घेतली. त्याने आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली. मदत केंद्रावर सर्व युवकांना जेवण देण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत प्रवासात पुरेल असा नाश्‍ता सोबत दिला. 

तुमचे कार्य प्रेरणा देऊन गेले 
दिनबंधू मदत केंद्रावरील आमची केलेली व्यवस्था, यामुळे मला नव्याने प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. महाराष्ट्रीय जेवण आणि सेवा आयुष्यभर विसरणार नाही. "मेरा रमजान... मेरे रोजे को अल्लाहने कबुल किया, मैं मेरे भाईयों की मदत कर रहा हूं. अल्ला को यही कबुल था, अशी प्रतिक्रिया मोहम्मद अझीम याने दिली. 

मोहम्मद अझीमचा सत्कार 
एका युवकाने हिंमत दाखवून गावातील युवकांच्या मदतीसाठी धाव घेतली. तसेच स्वतःजवळील पैसे खर्च करून ट्रकसह चेन्नईतून युवकांना घेऊन घरी परतणाऱ्या मोहम्मद अझीमच्या कार्याला दिनबंधू मदत केंद्राच्या कार्यकर्त्यांनी सलाम केला. मो. अझीमचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. आदरातिथ्य पाहून मो. अझीझचे डोळे पाणावले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com