करुणा शर्मांच्या कारमध्ये बंदूक ही गंभीर बाब, चौकशी झाली पाहिजे...

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी राज्याचा कारभार चालवण्यासाठी नव्हे तर लचके तोडण्यासाठी झाली आहे. प्रत्येक जण लचके तोडत आहे. काही जमले नाही तर आपसातच भांडत आहे.
Devendra Fadanvis Warning.
Devendra Fadanvis Warning.

नागपूर : करुणा शर्मा यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. Karuna Sharma Viral the VDO त्यानंतर त्या ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी आल्या होत्या. पण तेथे गडबड झाली. त्यांच्या कारमध्ये बंदूक आढळली. The Gun found in the car हा प्रकार गंभीर आहे. कोणीतरी त्यांच्या कारमध्ये बंदूक ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis  म्हणाले. 

फडणवीस म्हणाले, करुणा शर्मा यांची चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांनी राज्याच्या एका मंत्र्याने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी ते प्रकरण सोईस्कररीत्या थंड करण्यात आले होते. पण करुणा शर्मा यांनी जारी केलेल्या व्हिडिओनंतर ते प्रकरण पुन्हा चर्चेत आले. आणि सध्या ज्या घडामोडी झाल्या, त्या शंकेला वाव देणाऱ्या आहेत. आपल्या देशात आपली बाब मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि हे प्रकरण पाहता, बिना दबावात, निष्पक्ष, सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडीने लुकआउट नोटीस बजावल्याचे प्रसिद्ध माध्यमातूनच कळले. देशमुखांनी कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर ईडीला सामोरे जाणे हाच एकमेव उत्तम पर्याय असल्याचा सल्ला माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांमुळे देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या घरी, कार्यालय तसेच प्रतिष्ठानांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या दोन स्वीय सहायकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. उच्च न्यायालयानेसुद्धा कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे देशमुखांसमोर आता दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ते समोर येत नसल्याने लुकआउट नोटीस इडीने बजावली असावी, असे फडणवीस म्हणाले. 

आघाडी लचके तोडण्यासाठी
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी राज्याचा कारभार चालवण्यासाठी नव्हे तर लचके तोडण्यासाठी झाली आहे. प्रत्येक जण लचके तोडत आहे. काही जमले नाही तर आपसातच भांडत आहे. प्रत्येक जण मिळेल तशी संधी साधत आहे. आघाडीला जनतेशी काही देणेघेणे नसल्याचेही नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com