पदवीधर निवडणूक : कोण होणार नितीन गडकरींचा वारसदार ? - graduate election who will be nitin gadkaris successor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

पदवीधर निवडणूक : कोण होणार नितीन गडकरींचा वारसदार ?

राजेश चरपे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

निवडणुकीसाठी अनेक मतदारांनी ऑनलाईन नोंदणी केली. निवडणूक जाहीर झाली असली तरी त्यांची नावे प्रलंबितच आहे. सध्या एक लाख १३ हजार मतदारांची नावे यादीत आली आहेत. ऑनलाईन नोंदणीच्या नावांचा समावेश केला नाही तर अनेकांचे समीकरण बिघडू शकते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नोंदणी केली असल्याने अंतिम यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला जाईल.

नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली. गडकरी यांचा वारसदार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार प्राध्यापक अनिल सोले यांच्यासोबत महापौर संदीप जोशी यांच्या नावाची येथून जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने ॲड. अभिजित वंजारी यांना आधीच हिरवी झेंडी दाखवली. आता आणखी किती उमेदवार रिंगणात उडी घेतात यावरच विजयाचे समीकरण अवलंबून राहणार आहे.
 
नागपूरच्या पदवधीर मतदारसंघात आजवर भाजपचेच वर्चस्व आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार येथून निवडून आलेला नाही. गडकरी यांची राजकीय कारर्कीदच या निवडणुकीने घडविली. त्यांचे वारसदार म्हणून अनिल सोले यांनी हा मतदारसंघ भाजपकडे शाबूत ठेवला. मात्र संदीप जोशी यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर लढण्यास तयार आहो, असे सांगून जोशी यांनी आपले इरादे स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा कौल यंदा मिळेल, असा विश्वासही त्यांना आहे. 

काँग्रेसतर्फे प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी भाजपला दोनवेळा येथून जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. आता दमाचे तरुण अभिजित वंजारी तयारीला लागले आहेत. विदर्भाच्या मुद्यावर अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे यांनीही निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. आम आदमी पार्टी आणि बसपच्या समर्थनासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नागपूर विद्यापीठाच्या सिनेट परिवर्तन पॅनेलचे प्रशांत डेकाटे यांनीही तयारी चालविली आहे. बसपने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव पुढे केलेले नाही. अनेक संघटना आणि आघाड्यांचेही उमेदवार इच्छुक असल्याने यंदा ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. 

ऑनलाईनची नोंदणीच नाही? 
निवडणुकीसाठी अनेक मतदारांनी ऑनलाईन नोंदणी केली. निवडणूक जाहीर झाली असली तरी त्यांची नावे प्रलंबितच आहे. सध्या एक लाख १३ हजार मतदारांची नावे यादीत आली आहेत. ऑनलाईन नोंदणीच्या नावांचा समावेश केला नाही तर अनेकांचे समीकरण बिघडू शकते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नोंदणी केली असल्याने अंतिम यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

अशी होईल निवडणूक 
उमेदवारी अर्ज दाखल करणे ५ ते १२ नोव्हेंबर 
छाननी १३ नोव्हेंबर 
अर्ज मागे घेण्याची मुदत १७ नोव्हेंबर 
मतदान १ डिसेंबर, मतमोजणी ३ डिसेंबर          (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख