"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, असे हे सरकार' : आमदार गिरीष व्यास

महाराष्ट्रात सिंचनाचे जे प्रकल्प थांबलेले होते, ते सर्व प्रकल्प या सरकारने पुनर्रुजिवीत केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिंचनाच्या 134 प्रकल्पांसाठी सरकारने पैसा दिला. या देशाचा राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द गेल्या अनेक दशकांपासून स्थगित होता.
Girish Vyas
Girish Vyas

नागपूर : कोणत्याही सरकारचे काम समजून घेण्यासाठी पार्श्‍वभूमी समजून घेण्याची गरज असते. या पूर्वीचे पाच वर्षाचे सरकार आणि गेल्या एक वर्षातील मोदी सरकारचे कामकाज अतिषय कौतुकास्पद आहे. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही या सरकारचे कार्यकर्ते आहोत आणि या सरकारचं प्रतिनिधीत्व करतो. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले', अशा पद्धतीने मोदी सरकारचे कामकाज सुरु असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आमदार गिरीष व्यास म्हणाले. 

नागपूर, पुणे आणी मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता, मेट्रोसाठी भरीव निधी देण्याचं काम सरकारने केले. मागिल निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जेव्हा मोदी नागपुरात आले होते. तेव्हा त्यांनी नागपुरकरांना सांगितलं होतं की. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी मेट्रोचे लोकार्पण करेन. बोलल्याप्रमाणे ते नागपुरात आले, तेव्हा नाही पण नंतर त्यांनी ऑनलाईन नागपूर मेट्रोचे लोकार्पण केले. जसं बोलतात, तसं करुन दाखविणारे हे मोदी सरकार आहे. 

श्री व्यास म्हणाले, या पक्षाची स्थापनाच मुळात काश्‍मीर प्रश्‍नापासून झाली. "जहां हुए बलीदान मुखर्जी, वो कश्‍मीर हमारा है', ही भूमिका घेऊन आधीपासून या सरकारने काम केले आहे. मग ते 370 कलम हटवणे असेल किंवा 37 (1) असेल. आजपर्यंत जटील झालेला प्रश्‍न याच सरकारने सोडविला. राम मंदिराचा प्रश्‍न केवळ सोडविलाच नाही, तर सामंजस्याने सोडवला. देशभरात कुठेही गोंधळ उडाला नाही आणि या निर्णयाचे कौतुक झाले. या देशात आजपर्यंत लोकांपर्यंत सबसीडीज पोहोचत नव्हत्या, त्या आता जनतेच्या खात्यात थेट जमा होताहेत. निराधारांच्या, गरीबांच्या पाठीशी उभे राहण्याच महत्वपूर्ण काम या सरकारने केले आहे. 

सरकारचे हे कार्य आम्हाला मागील सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात दिसले आणि गेल्या एक वर्षातही दिसत आहे. या कोरोनाच्या संकटातही आपण बघू शकतो की कोट्यवधी रुपये सरकारने लोकांच्या खात्यात जमा केले. त्यामुळे जनतेमध्ये कोणताही असंतोष नाही. पण विदर्भातल्या काही लोकांमध्ये मात्र असंतोष बघायला मिळतो. आता ते म्हणताहेत की लोकांच्या खात्यात साडेसात हजार रुपये, 10 हजार रुपये जमा करा, हे काम मोदी सरकार करेलही. पण तेव्हा हेच लोक सांगायला पुढे-पुढे करतील की आमच्यामुळे हे पैसे तुम्हाला मिळाले आहेत. पण यांना माहीती नाही मोदींनी यापूर्वीच ते पैसे लोकांच्या खात्यात पोहोचविलेले आहेत, असा टोला आमदार व्यास यांनी हाणला. 

महाराष्ट्रात सिंचनाचे जे प्रकल्प थांबलेले होते, ते सर्व प्रकल्प या सरकारने पुनर्रुजिवीत केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिंचनाच्या 134 प्रकल्पांसाठी सरकारने पैसा दिला. या देशाचा राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द गेल्या अनेक दशकांपासून स्थगित होता. त्याचं काम पूर्ण होत नव्हतं. या सरकारने प्रकल्पाची कालमर्यादा 2021 ही ठरवली. त्याप्रमाणे हा प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल आणि जनतेच्या स्वाधीन होईल. यासाठी लागणारा सर्व निधी सरकारने दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

याशिवाय उज्वला गॅसच्या माध्यमातून, ऊर्जा क्षेत्रात, ग्रामीण भागांत अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, अटल जलपूर्तीच्या माध्यमातून किंवा पिण्याच्या पाण्याची निर्मल योजनेच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्राला, विदर्भाला आणि या जिल्ह्याला भरपूर दिले आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी सरकारने एक मोठे केंद्रीय पॅकेज दिले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. या सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही आमच्या बुथ रचनेच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहोत, असे आमदार व्यास यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com