गोपीचंद पडळकरांनी काढले मंत्री विजय वडेट्टीवारांचे शिक्षण…

किंबहुना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल.
Gopichand Padalkar - Vijay Wadettiwar.
Gopichand Padalkar - Vijay Wadettiwar.

नागपूर : महाविकास आघाडीत सहभागी पक्षांतील नेते आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सातत्याने वाढतच जात आहेत. भाजपचे नेते BJP Leaders सरकार पाडण्यावरून तर आघाडीतील नेते केंद्र सरकार Central Government करीत असलेल्या अन्यायावरून एकमेकांना टारगेट करीत असतात. आता भाजप नेते गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Minister Vijay Wadettiwar यांचे शिक्षण काढले आहे. 

पडळकरांनी फक्त त्यांचे शिक्षणच नाही काढले, तर त्यांच्यावर गोसीखुर्द प्रकल्पामध्ये ठेकेदारांकडून टक्केवारी घेणे, दारूची फॅक्टरी विकत घेणे, दारूची डीलरशीप घेणे, आदी गंभीर आरोप केले आहेत. पडळकरांनी पातळी सोडून वडेट्टीवारांना टारगेट केल्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापेल, असे बोलले जात आहे. तसेही पडळकर नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते म्हणूनच ओळखले जातात. पण आता त्यांनी राज्यातील मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसे पत्रच त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावे लिहिले आहे. 

पडळकर पत्रात लिहितात, ‘अतिमाननीय विजय वडेट्टीवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य.
महोदय, मी मा. मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर निष्क्रिय दिग्गजांच्या मंत्रिमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली, बरं आहे. किंबहुना, आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते. किंबहुना मला आपल्यासारखे केवळ दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते. 

किंबहुना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंडरस्टॅंडींग न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता. किंबहुना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधून दारूबंदी उठवता आली नसती. किंबहुना दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरित करता आले नसते. 

किंबहुना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल. मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते.’
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com