Good News : मागेल त्या जिल्ह्याला मिळेल आता मेडिकल कॉलेज…

कोरोनासारखी बिकट परिस्थिती राज्यावर आल्यास डॉक्टरही कमी पडतात. त्यामुळे प्रत्येक चांगले डॉक्टर्स तयार करण्यासाठी मेडिकल कॉलेजची गरज आहे.
Uday Samant
Uday Samant

भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज Medical College उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. State Government is possivite आरोग्य व्यवस्था तोकडी असली आणि ऐनवेळी कोरोनासारखा Corona हल्ला झाला की काय तारांबळ उडते, हे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लक्षात आले. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जो जिल्हा मागेल तेथे मेडिकल कॉलेज उभारण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी आज सांगितले. 

कोरोनासारखी बिकट परिस्थिती राज्यावर आल्यास डॉक्टरही कमी पडतात. त्यामुळे प्रत्येक चांगले डॉक्टर्स तयार करण्यासाठी मेडिकल कॉलेजची गरज आहे. त्यामुळे सरकार या गोष्टीवर विचार केला. कोरोना आटोक्यात आल्यावर ज्या जिल्ह्यातून मागणी होईल, त्या जिल्ह्याला तात्काल मेडिकल कॉलेज देण्यात येणार आहे. PPP मॉडेल हे धोरण राबविण्यास सरकार तयार झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. ते आज भंडाऱ्यात बोलत पत्रकारांशी बोलत होते. यासाठी एखादी एजंसी, सरकार आणि आरोग्य विभाग तिघांच्या साहाय्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

गेल्या २ वर्षात कॉलेज बंद असतानासुद्धा ग्रंथालय शुल्क, मेंटनन्स शुल्क, जिम शुल्क व इलेट्रिक शुल्काच्या नावाने जे शुल्क विद्यार्थ्यांवर लादण्यात आले, त्याबाबत FRA कमिटीचे अध्यक्ष जे निवृत्त न्यायाधीश असतात, त्यांची नियुक्ती झाल्यास लवकर तोडगा काढत पालक व संस्था यांच्यात सुवर्ण मध्य काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होतील, हे विभागाने कधीही सांगितले नव्हते.

विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्यादेखील आहेत. आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मी एका पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहे. या समारंभाला राज्यपालदेखील राहणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ आहे. विद्यापीठाच्या परीक्षा झाल्या. त्याचे निकालही दिले आहेत. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आज जो पुण्यातला कार्यक्रम आहे, असे चार कार्यक्रम आतापर्यंत झालेले आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कुठेही झालेला नाही. ऑनलाइन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व परीक्षा घेतलेल्या आहेत, असे मंत्री सामंत म्हणाले. 

राज्यात प्राध्यापक भरती लवकरच होणार आहे. तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढविणार आहोत. प्रोफेशनल कोर्सेसची सीईटी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. दुसरी लाट भयावह होती. मात्र आता हायकवार कमिटीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून ती फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. दोन-तीन दिवसांत मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, तर तासिका प्राध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत, तर त्या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com