गेलेले कामगार परतले, उद्योगांना येताहेत अच्छे दिन...

जिल्ह्यातील उद्योगांची उत्पादन पातळी आणि कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाण गेल्या दोन महिन्यापूर्वी ७० ते ७२ टक्के होते. त्या तुलनेत आता उत्पादन पातळीत वाढ झालेली आहे. कार्यरत मनुष्यबळाच्या संख्येतही चांगलीच वाढ झालेली आहे.
Sarkarnama
Sarkarnama

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत First and second wave of Corona जिल्ह्यातील कामगार जत्थेच्या जत्थे घेऊन आपआपल्या गावी गेले होते. दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे गेलेले कामगार परत आले आहेत. परिणामी उद्योगांना अच्छे दिन येत आहेत. Gone workers came back good days are coming to industries उत्पादनातही वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहेत. 

टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात चैतन्य आले आहे. कोरोना काळात पलायन केलेले आणि काहींच्या हातचे काम गेल्याने गावी परतलेले कुशल-अकुशल कामगार कारखान्यात परतले आहेत. उत्पादनातही लक्षवेधी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे पावणे तीन लाख कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला. असे असले तरी सरकारने आर्थिक साहाय्य केल्यास उत्पादन पूर्व पातळीला पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

जिल्ह्यातील उद्योगांची उत्पादन पातळी आणि कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाण गेल्या दोन महिन्यापूर्वी ७० ते ७२ टक्के होते. त्या तुलनेत आता उत्पादन पातळीत वाढ झालेली आहे. कार्यरत मनुष्यबळाच्या संख्येतही चांगलीच वाढ झालेली आहे. कोरोना काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर उत्पादन व रोजगार वाढीस पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. येत्या सणासुदीच्या काळात त्याला आणखी बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. 

उद्योग सुरू झालेले आहेत. मात्र, उत्पादनात ग्रोथ झालेली नाही. कमी उलाढाल असलेले उद्योग कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत. सरकारी बॅंकांनी या उद्योगांना मदतीचा हात दिल्यास उद्योगाला चांगले दिवस येतील. कारण कच्चा मालाचे दर वाढले असताना कार्पोरेट आणि इतर शासकीय संस्थांकडून त्या उत्पादनाच्या दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे ‘ना नफा ना तोटा‘ तत्त्वावर उद्योग सुरू आहे. 
श्रीकांत कोठारकर, 
सचिव बुटीबोरी मॅन्युक्चर्स असोसिएशन 

उद्योग आता रुळावर आलेले आहेत. ८५ टक्के उद्योगांची चाके फिरू लागलेली आहे. जीएसटी आणि विजेचा वापर काढल्यावरून हे निदर्शनात येत आहे. सध्या महागाई वाढलेली असली तरी ती आटोक्यात येणार आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने अर्थशास्त्राच्या नियमानुसार भाव वाढ झालेली आहे. 
मिलिंद कानडे, अध्यक्ष , उद्योग आघाडी 
 
उद्योग सुरू असले तरी त्यांची स्थिती गंभीर आहे. कच्चा मालाचे दर दीड पट वाढल्याने उद्योजकांचे कंबरडे मोडलेले असताना सरकारकडून हवी तशी मदत मिळत नाही आहे. या उद्योगांना आर्थिक मदतीची गरज आहे. 
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन 

दुसऱ्या लाटेमध्ये सलग सहा महिने बाजारपेठा बंद असल्याने मागणी कमी झाली होती. आता मागणी जरी वाढत असली तरी लहान उद्योजकांकडील पुंजी संपलेली आहे. त्यामुळे त्याची स्थितीत गंभीर झालेली आहे. 
सुंदर रतन, उद्योजक 
 
आकडे बोलतात 

उद्योग : ३५०० 
कामगार - २ लाख ७५ हजार
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com