रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला... - glad to see the remdesivir injection being prepared | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 मे 2021

संकट मोठे आहे. सगळ्यांनी हिमतीने आता प्रतिकार केला पाहिजे. तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे यावेळच्या अडचणी लक्षात घेऊन आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही माणसाचा मृत्यू ऑक्‍सिजन, औषधीविना होता काम नये, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे.

वर्धा : कोरोनाने देशभर हाहाकार माजविला असताना त्यात आशेची किरण शोधावी लागली. रेमडेसिव्हिरचा तुटवडा आणि काळाबाजार (shortage of Remedesivir and the black market) होत असल्याच्या बातम्या सतत ऐकून वाईट वाटत होते. पण आता वर्धेच्या जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये (genetic life sciences of Wardha) रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू झाले आहे. हे इंजेक्शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा मनापासून आनंद झाला, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. काल त्यांनी जेनेटिक लाइफची प्रत्यक्ष पाहणी केली. 

वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातच उत्पादन सुरू झाल्याने या औषधीचा काळाबाजार थांबेल. गरिबांना सरकारी दरात रेमडेसिव्हिर उपलब्ध होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. जेनेटिक लाइफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी असून वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एमआयडीसी परिसरातील प्रकल्पात (In the project in MIDC area at Sevagram) रेमडेसिव्हिर उत्पादनाला सुरुवात झाली आहे. येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. गडकरींनी काल प्रकल्पाला भेट देऊन आढावा घेतला. 

यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते. गडकरी यांनी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पहिल्यांदा करून महाराष्ट्रातदेखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरत्रही दिले जाईल. मात्र, वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल, (Wardha district will definitely get priority) असेही गडकरी यांनी सांगितले. 

वर्धेत उत्पादन सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण, देशातील, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी मदत केली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मंडलेकर (Union Minister Mansukh Mandviya, Assistant Mandlekar) यांनी परवानगी मिळविण्यासाठी मदत केली. अनेकांचे सहकार्य मिळाले. हेट्रो या हैदराबादच्या मल्टीनॅशनल कंपनीने जेनेटिक लाइफ सायन्सेसला सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. इंजेक्‍शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला, असेही गडकरी म्हणाले. 

हेही वाचा : धक्कादायक : संत्र्याच्या बागेत कोरोना रुग्णांवर होतायेत उपचार
 
तिसऱ्या लाटेची शक्‍यता 
संकट मोठे आहे. सगळ्यांनी हिमतीने आता प्रतिकार केला पाहिजे. तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे यावेळच्या अडचणी लक्षात घेऊन आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही माणसाचा मृत्यू ऑक्‍सिजन, औषधीविना होता काम नये, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे, असेही गडकरी म्हणाले. 

ऑक्सिजन मिळणार 
भिलाईवरून येणाऱ्या ऑक्सिजनमधून २० टन सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयाला देण्यात येईल. उर्वरित देवळीला साठवण्यात येईल. सेवाग्राम आणि सावंगी येथे २०-२० टन क्षमतेचे ऑक्‍सिजन प्रकल्प लवकर उभे करण्यासाठी पाठपुरावा करू, त्यामुळे वर्धा जिल्ह्यात ऑक्‍सिजनची कमी राहणार नाही.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख