पूजा चव्हाणला न्याय द्या, भाजयुमोने दाखवले वनमंत्री राठोडांना काळे झेंडे

मंत्री राठोड यांचा ताफा शहरात दाखल होत असताना दारव्हा मार्गावर एमआयडीसीच्या जवळ कार्यकर्ते त्यांच्या ताफ्याला आडवे आले. त्यामुळे काही काळ तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. पण आंदोलकांना चकवत ताफा पुढे निघून गेला आणि राठोडांचे कार्यकर्ते आणि भाजयुमोचे कार्यकर्ते आमने-सामने झाले नाहीत.
bjym
bjym

यवतमाळ : दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघात आज दिवसभर देवदर्शन आणि शक्तिप्रदर्शन करून सायंकाळी यवतमाळ शहरात परतत असलेले राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. पूजा चव्हाणला न्याय द्या, अशी घोषणाबाजी करीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. 

गेल्या १५ दिवसांपासून भूमिगत झालेले राठोड आज पोहरादेवी येथे प्रगटल्यानंतर तेथे त्यांच्या समर्थकांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत तुफान गर्दी केली. तिकडे समर्थक त्यांचे जोरदार समर्थन करीत असताना इकडे विरोधकांचे तोफ डागणे सुरू होते. भाजपचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर आशिष शेलार आणि भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी राठोडांवर आरोपांचा पाऊस पाडला. दरम्यान शहरात भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी भारतीय जनता महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनीही पूजा चव्हाणला न्याय देण्याची मागणी केली. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष आकाश धुरड, मनिष गायकवाड, नितीन चहांदकर, नितीन वासेकर, महेंद्र राजुरकर, प्रशांत निमकर, निखील खाडे सहभागी झाले होते. 

सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मंत्री राठोड यांचा ताफा शहरात दाखल होत असताना दारव्हा मार्गावर एमआयडीसीच्या जवळ कार्यकर्ते त्यांच्या ताफ्याला आडवे आले. त्यामुळे काही काळ तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. पण आंदोलकांना चकवत ताफा पुढे निघून गेला आणि राठोडांचे कार्यकर्ते आणि भाजयुमोचे कार्यकर्ते आमने-सामने झाले नाहीत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. आज संजय राठोड माध्यमांसमोर आले आणि गेल्या १५ दिवसांत त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोडून काढले. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर या प्रकरणातील सत्य जगासमोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शहरात प्रवेश केल्यानंतर मंत्री राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, ‘मी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत शिस्त लावण्यासाठी सरकारने मुदत दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही आम्ही २६ फेब्रुवारीपर्यंत वाट बघणार आहोत. तोपर्यंत लोकांनी स्वयंशिस्त पाळली आणि कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली. तर लॉकडाऊन टाळता येईल. अन्यथा २६ फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागेल. १५ दिवसांनंतर जनतेसमोर आलेल्या राठोड यांनी आज प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. तरी पण चौकशीचा अहवाल आल्यावर काय होईल, याची प्रतीक्षा जनतेला आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com