‘त्या’ १५ लाख लोकांना धान्य द्या, अन्यथा परिणाम भोगा; बावनकुळेंचा सरकारला इशारा...

संजय गांधी निराधार योजनेत गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात एकही पैसा आलेला नाही. हा पैसा लवकरात लवकर लोकांना वाटप करावा. कारण कोरोना संक्रमणाच्या या काळामध्ये लोकांचे खाण्याचेसुद्धा हाल होत आहेत.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

नागपूर : राज्य सरकारने नागपूर शहर व जिल्ह्यातील ४ लाख शिधापत्रिका एनपीएचमध्ये टाकल्या. परिणामी या ४ लाख शिधापत्रिकेवर अवलंबून असलेल्या १५ लाख लोकांना धान्य मिळत नाहीये. 1.5 million people do not get food grains हा सर्व कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाने सरकारच्या म्हणण्यावर केलेला आहे. त्यामुळे लाखो लोक आज अन्नापासून वंचित राहत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे Former Energy Minister and Bharatiya Janata Party State General Secretary Chandrasekhar Bavankule यांनी आज केला. ७ दिवसांत या लोकांना न्याय मिळाला नाही, तर मोठे आंदोलन उभारले जाईल आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

सरकारने उपरोक्त शिधापत्रिकाधारकांना नियतन वाढवून दिले तर अजून या लोकांना अन्न मिळू शकते. कोरोना संक्रमणाच्या काळात जे शिधापत्रिकाधारक दुकानांमध्ये जाऊ शकले नाहीत, अशा ५० हजार लोकांना केवळ धान्य घेण्याकरिता आ नाही म्हणून एनपीएचमध्ये टाकून दिले. या लोकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत होते. पण हे लोक कोरोनाच्या काळात लॉकडाऊमुळे दुकानांमध्ये जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना धान्याची गरज नाही, असे समजून धान्य देणेच बंद करून टाकले. हा कुठला नियम आहे आणि कोणता न्याय आहे. ही सरकारची सरळ सरळ मोगलशाही असल्याचा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला. 

चार लाख शिधापत्रिकांवर अवलंबून असलेल्या १५ लाख लोकांना नियतन मंजूर करा. या एनपीएचमध्ये टाकलेल्या शिधापत्रिका आणि दुकानांपर्यंत जाऊ न शकलेल्या ५० हजार लोकांना नियमित धान्य पुरवठा करा, या दोन महत्वाच्या मागण्या आज भाजपतर्फे करण्यात आल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेत गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात एकही पैसा आलेला नाही. हा पैसा लवकरात लवकर लोकांना वाटप करावा. कारण कोरोना संक्रमणाच्या या काळामध्ये लोकांचे खाण्याचेसुद्धा हाल होत आहेत. याची तरी जाणीव राज्य सरकारने ठेवावी. चार चार महिने निराधारांना पैसे दिले जात नाही, ही दुःखाची बाब असल्याचे सांगत बावनकुळे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. 

आज उपरोक्त मागण्यांचे निवेदन देताना बावनकुळे यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके, खासदार विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीष व्यास, विकास कुंभारे, संजय बंगाले, रामभाऊ आंबुलकर, सुनील मिश्रा आणि चंदन गोस्वामी होते. सरकारने येत्या ७ दिवसांत शिधापत्रिकांधारकांना न्याय दिला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि त्यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.       
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com