घुग्घुसमध्ये विकला चहा अन् भजे, तर अकोल्यामध्ये चुलीत घातल्या डिग्री...

शासकीय नोकरी आता केवळ दिव्य स्वप्नच झालेला आहे. केंद्रीय सत्ता मागील सत्तर वर्षात देशाने कमवलेली शासकीय संपत्ती विकण्यासाठी नियोजनबद्ध योजना राबविण्यात येत आहे.
Sarkarnama
Sarkarnama

घुग्घुस, अकोला : देशाला ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून खोट्या विकासाचा फुगा फुगवून पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी शासनाच्या काळात गेल्या पंचेचाळीस वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी देशाला पाहावी लागली. आजघडीला देशातील उच्चशिक्षित युवकांचा बेरोजगारी दर हे ६० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्घुसमध्ये कॉंग्रेसने चहा अन् भजे विकले, तर अकोल्यामध्ये युवक कॉंग्रेसने चुलीत डिग्री घातल्या. In ghugus tea is sold while in akola the degree is put in stove.

शासकीय नोकरी आता केवळ दिव्य स्वप्नच  झालेला आहे. केंद्रीय सत्ता मागील सत्तर वर्षात देशाने कमवलेली शासकीय संपत्ती विकण्यासाठी नियोजनबद्ध योजना राबविण्यात येत आहे. देशात बेरोजगारांचे लोंढेच लोंढे वाढत असून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बेरोजगार आणि बेरोजगारच दिसत आहे. रोजगाराअभावी युवकांत प्रचंड नैराश्य पसरत असून युवकांच्या आत्महत्येत प्रचंड वाढ झाली आहे. देशातील युवकांना प्रतिवर्ष दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.

देशातील युवकांनी "पकोडे " व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. मात्र वाढत्या महागाईत स्वयंपाक गॅस रिफिल करणे सर्वसामान्य नागरिकांना कठीण होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे प्रतीकात्मक "चहा" आणि भज्याची दुकाने लावण्यात आली व नागरिकांना चहा व भजी देण्यात आली. सदर आंदोलन हे पाण्याची टाकी परिसरात करण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष राजू रेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक जिल्हा सचिव सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, शेखर तंगळपल्ली, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, रोशन दंतलवार, विशाल मादर, रोहित डाकूर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

अकोला युवक काँग्रेसने चुलीत घातल्या ‘डिग्री’!
भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशभरात आज बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. यामुळे युवा वर्गात असंतोष आहे. त्याचे परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होत आहेत. शेतकऱ्यांसह युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. या निषेधार्थ भारतीय युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी आज साजरा करण्यात आला. यावेळी युवकांनी पदवीधर पोशाख परिधान करून प्राप्त केलेल्या प्रतीकात्मक पदव्या चुलीत पेटवल्या व मोदी सरकारच्या आर्थिक व रोजगार संबंधित धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून वाढत चाललेल्या बेरोजगारीच्या समस्येविरुद्ध अभिनव आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंशुमन देशमुख, नगरसेवक पराग कांबळे, प्रदेश पदाधिकारी सागर कावरे, कपिल ढोके, उपाध्यक्ष आकाश शिरसाठ, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, क्रीडा सेलचे जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, शेख अब्दुल्लाह, युवक काँग्रेसचे महासचिव अभिलाष तायडे, विजय जामनिक आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com