‘उज्वला’मधून गॅस दिला, पण ८५० रुपयांचे सिलिंडर गरीब कसे घेणार...

पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

चंद्रपूर : मोदी सरकारने उज्वला योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या घरात गॅस पोहोचवला. Modi government gave gas into poor people's houses तेव्हा त्याचे कौतुकही करण्यात आले. पण आता गॅस सिलिंडरची किंमत ८५० रुपये केली आहे. गरीब लोकांनी सिलिंडर कसे घ्यावे, हा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. गॅस दिल्यावर रॉकेलही बंद केले. त्यामुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय पुरता फसला आहे, असे वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर MLA of Warora Pratibha Dhanorkar  म्हणाल्या. 

केंद्र सरकारने निर्माण केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात आज आमदार धानोरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. झपाट्याने वाढत्या महागाईवर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. 

आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार धानोरकर यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करून अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात महिला प्रदेश सचिव नम्रता आचार्य-ठेमस्कर, महिला ग्रामीण अध्यक्ष चित्रा डांगे, महिला शहरअध्यक्ष सुनीता अग्रवाल, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, नगरसेविका सुनीता लोढीया, स्वाती त्रिवेदी, मीनाक्षी गुजरकर, लता बारापात्रे, शीतल कातकर, वाणी दरला, हर्षा चांदेकर, सुनीता धोटे, बोर्डाच्या सरपंच यशोदा खामनकर, वरोरा महिला तालुका अध्यक्ष रत्नमाला अहिरकर, प्रिया भोयर, प्रतिमा कातकर, प्रतिभा जीवतोडे, भाग्यश्री इंगळे, गोपिका परचाके, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, मोहन डोंगरे, कुणाल चहारे, पितांबर कश्यप यांची उपस्थिती होती. 

उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरीब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लीटर व डिझेल २२ रुपये लीटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०६ रुपये मोजावे लागत आहे. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करून ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. या जुलमी, अत्याचारी सरकारचा विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com