मुकुल वासनिकांचे खंदे समर्थक गज्जू यादव यांना पटोलेंनी केले निलंबित...
Nana Patole

मुकुल वासनिकांचे खंदे समर्थक गज्जू यादव यांना पटोलेंनी केले निलंबित...

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि विदर्भाचे प्रभारी चंद्रकांत पाटील आणि निवडणूक निरीक्षक रणजीत कांबळे यांनी गज्जू यादव यांनी पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा अहवाल दिला होता.

नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि श्रेष्ठींचे निकटवर्तीय असलेले रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक Former MP Mukul Wasnik यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य गज्जू यादव Former ZP member Gajju Yadav यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of Congress Nana patole यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि विदर्भाचे प्रभारी चंद्रकांत पाटील आणि निवडणूक निरीक्षक रणजीत कांबळे यांनी गज्जू यादव यांनी पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा अहवाल दिला होता. विशेष म्हणजे गज्जू यादव यांना काँग्रेसने रामटेक विधान विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी ते पराभूत झाले होते.  

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या काळात पारशिवनी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसचे जिल्हा परिषद दुधराम सव्वालाखे यांना यादव यांनी मारहाण केली होती. कॉंग्रेस कमिटीकडून या घटनेची चौकशी करण्यात आली होती. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यावरून यादव व सव्वालाखे यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर गज्जू यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सव्वालाखे यांना मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले होते. या प्रकरणात उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव (रा. वाहिटोला, ता. रामटेक ), रणवीर यादव, सचिन व अन्य तिघांविरुद्ध पारशिवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पारशिवनी येथील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्ते जमले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास उमेदवार कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात जाणार होते. रामटेक तालुक्यातील नगरधन जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे, बबलू बर्वे, प्रफुल कावळे, गोपाळ बुरडे यांच्यासह १५ कार्यकर्ते पक्ष कार्यालयात होते. कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर राजेंद्र मुळक हे कार्यालयातून नागपूरसाठी निघून गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास काँग्रेस नेते उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव, त्यांचा भाऊ रणवीर यादव, सचिन व अन्य तीन जण पक्ष कार्यालयात आले. त्यावेळी दुधाराम सव्वालाखे यांनी ‘साहेब नागपूर गये’, असे उत्तर दिले. त्यावर गज्जू यादव यांनी शिवीगाळ करणे सुरू केले. नंतर गज्जू यादव व रणवीर यादव यांनी दुधाराम सव्वालाखे यांना मारण्यास सुरुवात केली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली. 

झालेल्या मारहाणीत दुधाराम सव्वालाखे यांच्या कपाळाला जबर मार लागला. त्यांच्या हाताला व मानेला गंभीर दुखापत झाली. यानंतर बबलू बर्वे समोर आले व त्यांनी दुधाराम सव्वालाखे यांना बाजूस केले. नंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुधाराम सव्वालाखे यांना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनी तक्रारीत घटनेबद्दल पारशिवनी पोलिसांना माहिती दिली. उपचारानंतर त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारशिवणी पोलिसांनी दुधाराम सव्वालाखे यांच्या तक्रारीवरून उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव, रणवीर यादव, सचिन व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मी व सरपंच नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी, सचिन खागर यांच्यासह माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना भेटण्यास पारशिवनीच्या पक्ष कार्यालयात गेलो होतो. पं.स.साठी निवडणुकीच्या संदर्भात ‘ए-बी’फार्म वाटपाबाबत मुळक यांची भेट घ्यायची होती. ऑफिसमध्ये बसलो असताना मागे बसून असलेल्या सव्वालाखे व माझ्या लहान भावात काही बाचाबाची होऊन झोंबाझोंबीत माझ्या भावाच्या हातातील अंगठी सव्वालाखेंच्या कपाळाला लागून जखम झाली. वेळीच मी मध्यस्थी करून वाद संपवला व तिथून निघून आलो. 
- उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in