गडकरी म्हणाले, पांगरी पॅटर्न वापरून वाशीम जिल्हा टँकरमुक्त करा...

वाशीम जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा डाग पुसायचा आहे. यासाठी जलसंधारण कार्यातून कार्यरत रहावे, म्हणून नितीन गडकरी सतत प्रेरणा देऊन वेळोवेळी संपर्क करून बारकाईने सर्व परिस्थितीची जाणून घेत असतात. अशी प्रतिक्रिया पांगरी ग्रामसभा समन्वयक सचिन कुलकर्णी यांनी दिली.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव Village Pangari Mahadev in Washim district of mangrul pir tahasil या गावात ज्याप्रमाणे सूक्ष्म पाणलोटाचे काम सुरू आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र अशी कामे करून जिल्हा टँकरमुक्त करा, Free the district tanker by doing such works everywhere असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी केले. दुर्गम व उपेक्षित पांगरी (महादेव) या लोकवस्तीमधील लोकसहभागाने निर्माण झालेल्या भव्य तलावाचे लोकार्पण काल आभासी कार्यक्रमात केले. त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी श्रमदानातून केल्या जाणाऱ्या पांधण रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून व पूर्ती सिंचन विकास संस्थेच्या मार्गदर्शनात वाशीम जिल्ह्यातील ‘जलहक्क’ कार्यकर्ते सचिन कुळकर्णी उपेक्षित व मागासलेली गावे दत्तक घेऊन कार्य करत असतात. गेल्या सात महिन्यांपासून अत्यंत दुर्लक्षित वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात पांगरी (महादेव) या लोकवस्तीमध्ये ते कार्यरत आहेत. जलविभाजक रेषा (divide line or water shade) असलेल्या भू-क्षेत्रातील लोकसंख्या तब्बल ८०० पेक्षा अधिक असूनही २१ वर्षांपासून या पांगरी (महादेव) लोकवस्तीला ‘गाव’ म्हणून शासन दप्तरी ग्रामपंचायत नाही, गट ग्रामपंचायतही नाही. त्यामुळे हे गाव विकासापासून दुर्लक्षित आहे. एवढ्या मोठ्या लोकवस्तीला ग्रामपंचायतीचा दर्जा नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

लोकवस्तीत सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा असून एक किलोमीटर अंतरावरून एका खाजगी विहिरीतून पाणी आणावे लागते. गावात अती कॅल्शियमयुक्त पाणी असल्यामुळे सहा रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर सात रुग्ण मूत्रपिंडाच्या आजाराने डायलिसिस वर आहेत. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून सचिन कुळकर्णी यांनी या भटक्या विमुक्त समुदाय असलेल्या वनग्राम पांगरीमध्ये कार्यरत होऊन पुढाकार घेतला. ‘लोकवस्तीमध्ये स्वहक्काचे मुबलक पाणी असल्यास विकासाला गती प्राप्त होते’, हा सिद्धांत गावकऱ्यांना पटवून सूक्ष्म उपपाणलोट राबविण्याचा संकल्प केला. पहिली पायरी म्हणून लोकसहभागातून १०० बाय १०० बाय ३ मीटरचा भव्य गावतलाव पडीक जमिनीवर निर्माण केला.


गावातून वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे दीड किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून शिल्लक तीन किलोमीटर नाल्याचे व अंदाजे ४ किलोमीटर छोट्या उपनाल्याचे काम साधनांअभावी शिल्लक आहे. नुकत्याच अचानक काही मिनिटे झालेल्या अवकाळी पावसामुळे, खोलीकरण - रुंदीकरण झालेल्या नाल्यात तुडुंब पाणी भरल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यामुळे गाव परिसराची व शेत शिवाराची भूजल पातळी चांगली वाढवून गाव हक्काच्या तलावात तुडुंब पाणी भरलेले राहील. ज्याचा परिणाम शेत शिवारावर होऊन शेती पिकाला चांगली मदत होईल. तसेच या परिसरातील विविध प्रजातीचे बांबू वन निर्माण करणे, स्वयंरोजगार निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नवनिर्माण केलेल्या भव्य तलावाचे लोकार्पण, श्रमदानातून होणाऱ्या पांधण रस्त्यांचे भूमिपूजन गडकरींच्या शुभहस्ते केल्या गेले. त्यांच्या कार्याला पांगरी गावकऱ्यांच्या सहभागातून दत्ताजी जामदार, माधव कोटस्थाने, व्ही. डी. पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी भरीव सहकार्य केले आहे. आभासी सभेद्वारे जेव्हा गडकरींनी गावकऱ्यांशी संवाद साधला, तेव्हा गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. वाढदिवशी दुर्गम भागांमध्ये भटक्या विमुक्त बांधवांशी चर्चा करून उपाययोजना करण्याची त्यांनी केलेली धडपड सर्वत्र चर्चेत आहे. 

वाशीम जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा डाग पुसायचा आहे. यासाठी जलसंधारण कार्यातून कार्यरत रहावे, म्हणून नितीन गडकरी सतत प्रेरणा देऊन वेळोवेळी संपर्क करून बारकाईने सर्व परिस्थितीची जाणून घेत असतात. अशी प्रतिक्रिया पांगरी ग्रामसभा समन्वयक सचिन कुलकर्णी यांनी दिली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com