गडकरी म्हणाले; उद्धवजी, तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू…

वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवायची कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे.
गडकरी म्हणाले; उद्धवजी, तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू…
Uddhav Thackeray - Nitin Gadkari

नागपूर : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे करीत असलेल्या ठेकेदारांना शिवसेनेचे Shivsena काही पदाधिकारी धमकावत आहेत आणि काम बंद करण्यास सांगत आहेत. सुरू असलेली कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यात आल्यास महाराष्ट्राचे व जनतेचे नुकसान होईल. आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांना पाठविले आहे. 

गडकरी पत्रात म्हणतात, राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गांचे काम करताना अडचणी येत आहेत. तसेच काही ठिकाणचे स्थानिक नेते या कामात अडथळा आणत आहेत. त्यांनी हे पत्र २७ जुलैला लिहिले असून अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या महामार्गाच्या  चौपदरीकरणाबद्दल लिहिले आहे. त्याबरोबर मालेगाव, मेहकर, सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच इतरही काही रस्ते त्यांनी नमूद केले आहे. तिकडचे स्थानिक नेते मंडळी या कामामध्ये अडथळा आणत असून स्थानिक पातळीच्या राजकारण आडवे येत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते देखील सेनेचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे गडकरींनी यामध्ये म्हटले आहे. त्यामुळेच गडकरींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याचे बोलले जाते. 

पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम आमच्या मंत्रालय करत आहे. मात्र, वाशीम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशीम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी मशीनरिची जाळपोळ करून कंत्राटदाराच्या कामगारांमध्ये  दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद पडले आहे.

मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता लवकरच पूर्ण होईल. या रस्त्याच्या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरूपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाची कामं सुरू आहेत. मेडशी ते वाशीम या पॅकेज-२ मध्ये वाशीम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, वरील सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील सेनेच्या लोकप्रतिनिधींनी थांबविल्याचे मला सांगण्यात आले आहे.

वरील सर्व बाबी लक्षात घेता वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवायची कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल, असे गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in