भोरगड आणि खंडाळ्यावर माजी सभापती सरोदेंचा दावा… - former speaker claim on bhorgad and khandala | Politics Marathi News - Sarkarnama

भोरगड आणि खंडाळ्यावर माजी सभापती सरोदेंचा दावा…

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

राष्ट्रवादी समर्थीत बेलखडे पॅनलच दारूण पराभव झाला आहे. दुसऱ्यांच्या मुलांना आपले नाव देण्याची सवय आम्हाला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर सत्य काय ते सर्वांनी सांगावे, अशी अपेक्षा आहे. विनाकारणचे दावे करून जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम कुणी करू नये.

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले आहेत. आता विजयी उमेदवारांवर दावे-प्रतिदावे ठोकणे सुरू झाले आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केलेल्या दोन ग्रामपंचायतींवर आता भारतीय जनता पक्षानेही दावा केला आहे. भोरगड आणि खंडाळा या दोन ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असल्याचा दावा काटोल पंचायत समितीचे माजी सभापती संदीप सरोदे यांनी केला आहे.

याबाबत संदीप सरोदे म्हणाले की, काटोल विधानसभा मतदारसंघातील इतर ग्रामपंचायतींवर आम्ही दावा केलेला नाही. कारण तेथे आमचे उमेदवार विजयी झाले नाहीत. त्यामुळे भोरगड आणि खंडाळा खुर्द येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा करू नये. भोरगडमध्ये रोशन खरपुरीया १६९ मते, कुसुम गजाम १५५, नारायण शेंडे १२९, योगिता गजाम १४२, अरूण उईके १७९, निरंजन टिकाराम कुमेरीया २०० आणि अर्चना सय्याम ११९ मते घेऊन विजयी झाले आहेत. हे सर्व उमेदवर भाजप समर्थित आहेत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित सातही उमेदवार पराभूत झाले आहेत.  

त्याचप्रमाणे खंडाळा खुर्द येथे भाजप समर्थित रोशनी मनोज पातोडे, विजय सिताराम परतेती, हेमेंद्र मुरलीधर चरडे, रेखा किशोर सय्याम, वच्छला मोरेश्वर ढोबळे, राधा ज्ञानेश्वर रेवतकर, राहुल रमेश पाटील यांचा विजय झाले आहे. येथे राष्ट्रवादी समर्थीत बेलखडे पॅनलच दारूण पराभव झाला आहे. दुसऱ्यांच्या मुलांना आपले नाव देण्याची सवय आम्हाला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर सत्य काय ते सर्वांनी सांगावे, अशी अपेक्षा आहे. विनाकारणचे दावे करून जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम कुणी करू नये, असेही संदीप सरोदे यावेळी म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख