माजी आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, अजून ५ नेते मार्गावर...

स्वगृही परतल्यानंतर त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा काय असेल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण अमरावतीच्या आमदार कॉंग्रेसच्याच सुलभा खोडके आहेत. त्यामुळे डॉ. देशमुख आता पुढे काय करतील?
Sunil Deshmukh
Sunil Deshmukh

नागपूर : अमरावतीचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख Former MLA of Amravati Dr. Sunil Deshmukh स्वगृही कॉंग्रेसमध्ये Congress परतले आहेत. आज सकाळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे. कॉंग्रेसमध्ये अन्याय झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश BJP घेतला होता. ते कॉंग्रेसमध्ये एकटेच आले नसून त्यांच्याशिवाय अजून पाच नेते कॉंग्रेसच्या मार्गावर असल्याचीही माहिती मिळत आहे. Fivr More leaders on the way of Congress. 

डॉ. सुनील देशमुख अमरावती महानगरपलिकेच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर कार्यक्षेत्र वाढविले आणि अमरावती विधानसभा क्षेत्रावर पकड मिळविली आणि आमदार झाले. नंतर ते राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री होते. त्यांची कारकीर्द चांगली सुरू होती. पण सन २००९ मध्ये भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना कॉंग्रेसने त्यांना डावलून रावसाहेब शेखावत यांना अमरावती विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. त्यावेळी पक्षावर नाराज होऊन त्यांनी बंड केले आणि अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि रावसाहेब शेखावत आमदार झाले. तरीही डॉ. देशमुख राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिले.

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. देशमुख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीची तयारी सुरू केली. या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत आमदारपदाची माळ पुन्हा आपल्या गळ्यात पाडून घेतली आणि अमरावती विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व आहे, हे दाखवून दिले. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी मतदारसंघासाठी उत्कृष्ट कार्य केले. २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांनी डॉ. देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर मात्र त्यांचे मन भाजपमध्ये रमले नाही आणि आज अखेर त्यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 

२०१४ ते १९ या सात वर्षाच्या काळात ते भाजपमध्ये राहिले. येथे काम करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. तरीही त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारल्यामुळे काही भाजप नेते आश्‍चर्य व्यक्त करीत आहे. स्वगृही परतल्यानंतर त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा काय असेल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण अमरावतीच्या आमदार कॉंग्रेसच्याच सुलभा खोडके आहेत. त्यामुळे डॉ. देशमुख आता पुढे काय करतील, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. आणखी पाच नेते कॉंग्रेसच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप त्यांची नावे कळू शकलेली नाहीत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com