माजी आमदार अँड.अनंतराव देवसरकर यांचे निधन 

जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. त्यांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व केले होते.
Anantrao Devasarkar
Anantrao Devasarkar

यवतमाळ : उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲड. अनंतराव देवसरकर यांचे आज ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष याशिवाय इतरही अनेक संस्थांचे पदाधिकारी राहिलेले अनंतराव देवसरकर यांची उमरखेड विभागामध्ये 'वकील साहेब' म्हणून वेगळी ओळख होती.

जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. त्यांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व केले होते. आज औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयांमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर व डॉ. भरत देवसरकर ही दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा आप्तपरिवार आहे. अंत्यविधी उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांचे मूळ गावी चातारी येथे होणार आहे.
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com