माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजित यांचे निधन...

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ते चुलत भाऊ होते.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजित यांचे निधन...
Sarkarnama

नागपूर : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस BJP's Senior Leader Shobhatai Fadanvis's Son Abhijeet यांचे पुत्र अभिजित फडणवीस यांचे आज बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने नागपुरात निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे फडणवीस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   

अभिजित यांना नागपुरातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यात सकाळी ९.३० वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ते चुलत भाऊ होते. अभिजित यांच्या मागे मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने फडणवीस कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in