माजी मंत्री बडोले म्हणाले, कॉग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात सत्ता आली अन् धान्य खरेदी थांबली !

रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी आम्ही आतापर्यंत निवेदने दिली. २७ मे पर्यंत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा अल्टीमेटम आम्ही १९ मे रोजीच प्रशासनाला दिला होता. धान खरेदी नवीन ४२ केंद्र आहेत, तर जुने ६९ केंद्र आहेत. ४२ केंद्रांना यावर्षी मंजुरी देण्यात आली आहे.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

भंडारा : राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली अन् धान खरेदी थांबली, Congress-NCP came to power in the state and stopped buying foodgrains! असा खळबळ जनक आरोप माजी सामाजिक न्याय मंत्री व  भाजप नेते राजकुमार बड़ोले Rajkumar Badole यांनी केला. गोंदीया जिल्हा भाजपच्या Gondia District BJP वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर In front of Collector Office आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त आरोप केला. 

यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या खरीप हंगामाचा धान आधारभूत धान खरेदी केंदावर धुळखात पडून आहे. रब्बी हंगामाच्या धानाची खरेदी प्रक्रिया थांबली असल्याने अद्याप एक क्विंटलही धानाची खरेदी झालेली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर पायपीट सुरू आहे. त्यामुळे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी काल गोंदियात जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. असून माजी मंत्री परिणय फुके यांच्यासह आजी माजी आमदार आंदोलनात सहभागी झाले होता. येत्या १० जूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे. 

येथील धान खरेदी केंद्रांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. यावर्षी धान खरेदीमध्ये होत असलेली दिरंगाई, बोगस पद्धतीने वाटप करण्यात आलेले धान खरेदी केंद्र याचा विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन केले. काल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येथे येऊन गेले. धान खरेदीच्या बाबतीत ज्या त्रुट्या आहेत, त्या दूर करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन भंडारा-गोंदीया जिल्ह्याच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आमदार परिणय फुके म्हणाले. 

रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी आम्ही आतापर्यंत निवेदने दिली. २७ मे पर्यंत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा अल्टीमेटम आम्ही १९ मे रोजीच प्रशासनाला दिला होता. धान खरेदी नवीन ४२ केंद्र आहेत, तर जुने ६९ केंद्र आहेत. ४२ केंद्रांना यावर्षी मंजुरी देण्यात आली आहे. पण त्यांच्याकडे खरेदीची कोणतीही व्यवस्था नाही, गोडाऊनदेखील नाहीत. त्यामुळे आजपर्यंत धानाचा एक दाणाही खरेदी करण्यात आलेला नाही. जवळपास ६५ लाख हेक्टरवर धानाची रोवणी झाली आहे. एकूण ३४ लाख क्विंटल धानाचा खरेदी करायची आहे. पण आजही शेतकऱ्यांकडे धान पडून आहे. गरजू शेतकरी व्यापाऱ्यांना बेभाव विक्री करीत आहे आणि आधारभूत किंमत त्यांना मिळत नाही, असे तिरोड्याचे आमदार विजय राहगडाले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com