माजी मुख्यमंत्री २०१९मध्ये औरंगाबाद लिहितात, अन् आता…

संभाजी महाराजांच्या विरोधात कोण लोक होते, हे आज वेगळे सांगण्याची गरज नाही. संभाजी महाराजांची जेव्हा हत्या झाली,जेव्हा त्यांना संपवलं गेलं. त्यावेळी त्यांना उचलून समाधी बांधण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. ती हिंमत बहुजन समाजातील लोकांनीदाखवली होती,
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

नागपूर ः औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राज्यभर वाद पेटला आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आग ओकत आहे. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री २०१९ मध्ये औरंगाबाद लिहितात. २०२० मध्ये संभाजीनगर लिहितात. राजकीय सोयीनुसार ते वागत असतात, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.  

वडेट्टीवार म्हणाले, २०१९ चे माजी मुख्यमंत्र्यांचे ट्विट बघितले तर या गोष्टीची खात्री पटते. आजही ज्यांनी संभाजीनगरचा वाद उकरून काढला आहे. ते लोक आपल्या राजकारणाच्या हिशोबाने मते बदलवीत राहतात. समाजातील लोकांचे मने कलुषित होऊ नये. सर्वांनी एकमताने, एकदिलाने या राज्यात नांदावे, आपसात मतभेद वाढू नये, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. एकमेकांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेतले तर वाद उत्पन्न होणार नाही.  संभाजी महाराजांचं नाव फार मोठे आहे. त्यांच्या नावाला कुणाचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. 
 
संभाजी महाराजांच्या विरोधात कोण लोक होते, हे आज वेगळे सांगण्याची गरज नाही. संभाजी महाराजांची जेव्हा हत्या झाली, जेव्हा त्यांना संपवलं गेलं. त्यावेळी त्यांना उचलून समाधी बांधण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. ती हिंमत बहुजन समाजातील लोकांनाी दाखवली होती, हा सुद्धा इतिहास आहे. नावाची अस्मिता ही आहेच आणि ती असायलाही पाहिजे. तेव्हा बहुजनांचे राज्य होते. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. 

महाराजांच्या राज्यात मुस्लीम, दलित, कोळी सर्व समाजाची लोक एकदिलाने राहत होती. त्यामुळे आजही नावावरून येवढा मोठा वाद पेटवण्याचे प्रयत्न कुणी करू नये. समाजातील लोकांचे मतभेद वाढू नये, अशी भूमिका सर्वांची असली पाहिजे. कॉंग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे. नावाबाबत कुणी काही निर्णय घेत असतील, तर तो त्यांच्या पक्ष पातळीवरचा निर्णय आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com