भाजपचे माजी आमदार म्हणाले, आता तरी पक्षाने आत्मचिंतन करावे…

नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा मजबूत गढ होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे. येथे पराभवाचे तोंड बघावे लागेल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे हा पराभव भाजपमधील प्रत्येकाच्या जिव्हारी लागला आहे.
Charan Waghmare Bhandara
Charan Waghmare Bhandara

भंडारा ः नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचे संदीप जोशी यांचा पराभव केला. हा पराभव भाजप नेत्यांचा चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. भाजपचे नेतेही पक्षाला सल्ले देऊ लागले आहेत. माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चरण वाघमारे यांनी आता पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 

वाघमारे यांनी भाजपला घरचा अहेर दिल्याने यावर पक्षातून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. श्री वाघमारे म्हणाले, ५८ वर्षांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड राहिलेला आहे. हा गड ढासळवणे येवढेही सहज शक्य नव्हते. पण यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले. पूर्ण ताकदीनिशी त्यांनी निवडणूक लढविली. प्रचारात त्यांनी ब्राम्हण विरुद्ध ओबीसी हा मुद्दा पुढे आणला. त्याचा मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर झाला. 

भारतीय जनता पक्षातील नेत्यांना आत्मचिंतन करण्याची वेळ या निवडणुकीच्या निकालाने आणली आहे, हे मात्र खरे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचे काम केले. माझ्या मतदारसंघात बुथनिहाय विचार केला तर कुठे आम्ही कमी पडलो, याचे चिंतन केले पाहिजे. पण बॅलेट पेपरवर मतदान झाल्यामुळे ती संधी आमच्याकडे नाही. पण पक्षाने आता तरी आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया चरण वाघमारे यांनी दिली. 

नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा मजबूत गढ होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे. येथे पराभवाचे तोंड बघावे लागेल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे हा पराभव भाजपमधील प्रत्येकाच्या जिव्हारी लागला आहे. जो-तो आपआपल्या परीने पराभवाची कारणमीमांसा करत आहे. तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांना भविष्यातील निवडणुकांची चिंता लागली असल्याचे सध्या पक्षातील वातावरण बघून वाटते. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com