आमदारालाच पाच कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार !

आमदार भारसाकळे यांच्या स्वीय सहायकांनी दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई व आमदार भारसाकळे यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी आमदार भारसाकळे यांचा जबाब नोंदविला.
Prakash Bharsakale
Prakash Bharsakale

दर्यापूर (जि. अमरावती) : येथील रहिवासी आणि अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना निनावी पत्र पाठवून पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात दर्यापूर पोलिसांनी भारसाकळे यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.

आमदार प्रकाश भारसाकळे यांना खंडणी मागण्यासोबतच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपींमध्ये दर्यापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा शेतकरी जिनिंग-प्रेसिंगचे माजी अध्यक्ष विक्रमसिंह परिहार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम ऊर्फ मनोज तायडे आणि संदीप गावंडे यांचे नाव आहे. त्यामुळे या धमकीपत्राचे परिणाम दर्यापुरातील राजकीय क्षेत्रात उमटण्याची शक्‍यता आहे. आमदार भारसाकळे यांच्या स्थानिक शिवाजीनगर येथील पत्त्यावर २० फेब्रुवारी रोजी एक निनावी पत्र आले होते. 

पत्रातील मजकुरात आमदार भारसाकळे यांना पाच कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांना व त्यांच्या मुलास गोळ्या झाडून मारण्याची धमकी देण्यात आली होती. आमदार भारसाकळे यांच्या स्वीय सहायकांनी दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई व आमदार भारसाकळे यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी आमदार भारसाकळे यांचा जबाब नोंदविला. त्यांच्या जबाबावरून संशयित आरोपी विक्रमसिंह परिहार, मनोज तायडे आणि संदीप गावंडे यांच्या विरोधात त्याच दिवशी १ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्या तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांना चौकशीसाठी बोलावून बयाण नोंदविण्यात येईल. अद्याप त्यात कुणाला अटक झालेली नाही.
- प्रमेश आत्राम, पोलिस निरीक्षक, दर्यापूर पोलिस ठाणे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com