अभिजित वंजारींच्या आयुष्यातील पहिला विजय ! - this is the first victory in abhijeet wanjaris life | Politics Marathi News - Sarkarnama

अभिजित वंजारींच्या आयुष्यातील पहिला विजय !

भाग्यश्री राऊत
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही पोटनिवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना १९ हजार १५३ मते मिळाली होती. पण त्यातही अपयश आले. त्यानंतर ते परत काँग्रेसमध्ये आले.

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधील हा त्यांचा पहिलाच विजय आहे. यापूर्वी त्यांनी दोन विधानसभा निवडणुका, एक महापालिका निवडणूक लढविली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले होते.

अभिजित वंजारी यांचा जन्म १० मे १९७३ ला झाला. त्यांनी नागपुरातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एलएलबी केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात १९८८ ते २००२ पर्यंत या काळात एनएसयुआयचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. अभिजित वंजारी यांचे वडील गोंविदराव वंजारी आमदार होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर २००५ च्या निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघातून त्यांचे वडील गोंविदराव वंजारी यांनी निवडणूक लढविली होती. ते विजयी देखील झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता. 

त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. मात्र, काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही पोटनिवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना १९ हजार १५३ मते मिळाली होती. पण त्यातही अपयश आले. त्यानंतर ते परत काँग्रेसमध्ये आले. त्यांनी २०१४ मध्ये पूर्व नागपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना ५० हजार ५२४ मते मिळाली. मात्र, ते विजयापासून दूर होते. 

अभिजित वंजारी यांनी भूषविलेली पदे -
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस माजी सचिव
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या युवक आणि स्पोर्ट्सचे माजी उपाध्यक्ष
नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनगरल सेक्रेटरी आणि प्रवक्ते
उत्तर प्रदेश, बिहार, गोंदिया आणि तिरोडा - निवडणूक निरीक्षक
नागपूर विद्यापीठातील व्यवस्थापक कौंसिलचे सदस्य
नागपूर विद्यापीठातील सिनेट सदस्य
अमर सेवा मंडळ, नागपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव
गोविंद अर्बन क्रेडीट को.  सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष
गोंविदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव

अभिजित वंजारी यांना मिळालेला पुरस्कार -
बिझिनेस आयकॉन इन कॉफी बुक टेबल अवार्ड
Edited By : Atul Mehere
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख