पहिला कल येणार दुपारी ३ च्या सुमारास, टपाल मतमोजणी सुरू...

दुसऱ्या पसंतीक्रमाची मतमोजणी होण्यासाठी रात्री ८ ते ९ वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामध्ये निकालाचा कल स्पष्ट झाला तर ठीक, नाहीतर तिसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीसाठी रात्रीचे १२ वाजतील.
Graduate Counting
Graduate Counting

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान झाले. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. अवैध मते वेगळी काढणे आणि गठ्ठे तयार करण्याचे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. सुरू असलेल्या प्रक्रियेची गती पाहता पहिला कल येण्यासाठी किमान दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता आहे. टपाल मतमोजणी सुरू झाली आहे. 

मतदान सुरू असलेल्या मानकापूर क्रीडा संकुलातून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सद्यःस्थितीत मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येतील. दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याची शक्यता आहे. ती वेळेत सुरू झाल्यास पहिला कल दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान हाती येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कल स्पष्ट होईल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

दुसऱ्या पसंतीक्रमाची मतमोजणी होण्यासाठी रात्री ८ ते ९ वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामध्ये निकालाचा कल स्पष्ट झाला तर ठीक, नाहीतर तिसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीसाठी रात्रीचे १२ वाजतील, असे सांगण्यात आले आहे. तसे झाल्यास सर्व उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे जागरण निश्‍चित आहे. टपाल मतमोजणी सुरू झालेली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com