आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता परब; लिस्ट मोठी आहे...

संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, ती केस चालवायला पाहिजे होती आणि आतापर्यंत संपवायलादेखील पाहिजे होती. पण तसे न करता एक फेक केस तयार करून त्यांना क्लिन चीट देण्यात आली.
आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता परब; लिस्ट मोठी आहे...
Chandrakant Patil.

नागपूर : महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी चौकशीत सहकार्य करायला हवे. परिवहन मंत्री अनिल परब Minister Anil Parab कितीही व्यस्त असले तरी त्यांनी ईडीकडे चौकशीला जायला हवं होतं. आधी वनमंत्री संजय राठोड Forest Minister Sanjay Rathore गेले, मग गृहमंत्री अनिल देशमुख Home Minister Anil Deshmukh आणि आता परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे. राज्य सरकारमधील अशा मंत्र्यांची लिस्ट मोठी आहे. लागेल आता एकेकाचा नंबर, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. State President of BJP Chandrakant Patil. 

चंद्रकांत पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांचे नागपुरात आगमन झाले. सकाळी काही कार्यक्रम आटोपून ते आमदार गिरीष व्यास यांच्या घरी आले असताना माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, हे मंत्री कोण लागून गेले? सर्वसामान्य माणसाला लागलीच अटक होते. मग राठोड, व्यास, परब हे कोण लागून गेले. त्यांनी ईडी कडे चौकशीला जायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललंय आणि परबही त्यांच्या कित्ता गिरवत आहेत. त्यांनी कितीही बहाणे केले तरी, सक्तवसुली संचालनालय त्यांची चौकशी करणारच आहे. 

शिवसेनेच्या पायाखालील वाळू सरकली...

मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस येताच शिवसेनेच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यांना माहिती आहे की नाही, माहिती नाही. पण मंत्र्यांची भली मोठी लिस्ट आणखी मोठी आहे. अनेक जण रांगेत आहेत. काही जण सुपात आहेत, तर काही जात्यात. एजंसी त्यांचे काम चोखपणे करते आहे. ते आणखी माहिती काढतील. असे मंत्री असल्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे. तरीही आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत आहे, पण ते वाचणार नाहीत. तर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई नक्कीच होणार आहे. 

तिसऱ्या लाटेची भिती दाखवली जातेय…
राज्य सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती दाखवत आहे. पण असे न करता आता संपूर्ण जनजीवन सुरळीत केले पाहिजे. जनता कंटाळून रस्त्यावर उतरण्याआधीच सरकारने सुधारून जायला हवे. कारण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले. पण अजून त्याला अटक झालेली नाही. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, ती केस चालवायला पाहिजे होती आणि आतापर्यंत संपवायलादेखील पाहिजे होती. पण तसे न करता एक फेक केस तयार करून त्यांना क्लिन चीट देण्यात आली. तीच केस पूजा चव्हाणच्या प्रकरणाशी जोडून परसेप्शन तयार करण्याचं काम सुरू असल्याचा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्या क्लीनचिट बाबत असंच झालं, असल्याचंही ते म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in