‘शक्ती’ विधीमंडळ समितीची पहिली बैठक आज नागपुरात 

हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री आहेत. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, महिलांच्या संघटना, विधिज्ञ, स्वयंसेवी संस्था आपल्या सूचना अथवा सुधारणा सुचवू शकतात.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतीमान पद्धतीने कार्यवाही व्हावी, या दृष्टीने प्रस्तावीत शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रीत महिला तसेच वकील संघटनांसोबत शक्ती कायद्यासंदर्भातील विधीमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार आहे. या समितीची पहिली बैठक आज येथील विधान भवनात होणार आहे. निमंत्रित महिला व वकिल संघटनासोबत आज चर्चा करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे या बैठका होणार आहेत. यासाठी महिला संघटना व वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत. आजची येथील बैठक झाल्यानतर १९ जानेवारीला मुंबई येथे तर २९ जानेवारीला औरंगाबाद येथे या बैठका होतील, असेही गृहमंत्र्यंनी सांगितले. यासाठी संबधीतांनी आपले मत लेखी स्वरुपात आणावे. संबधीत तारखेला तिनही ठिकाणी दुपारी ३ वाजता निमंत्रीत महिला संघटना तसेच सायंकाळी ५ वाजता वकिल संघटना, अशा वेळा ठरवण्यात आल्या आहेत.  

नागरिकांना आवाहन
माता-भगिनी व बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता शक्ती हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात, असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे. हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री आहेत. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, महिलांच्या संघटना, विधिज्ञ, स्वयंसेवी संस्था आपल्या सूचना अथवा सुधारणा सुचवू शकतात.

या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रति शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय चर्नी रोड मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या विधेयकाची प्रत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. संबंधितांनी आपल्या सूचना सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतीमध्ये विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रिक्लेमेशन मुंबई येथे किंवा a1.assem-bly.mls@gmail.com या ईमेलवर 15 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवाव्या, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com