अखेर बावनकुळेंवरील नाराजी दूर, प्रदेश कार्यकारिणीत झाले महामंत्री 

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या विरोधात कुठलेही भाष्य केले नाही. मध्यंतरी शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांना ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेत उमेदवारी देऊन बावनकुळे यांचे पुनर्वसन केले जाईल, असेही तर्क लावले जात होते. आता कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देऊन बावनकुळे यांच्यावरची नाराजी दूर झाल्याचे संकेत भाजपने दिले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

नागपूर : कामठी विधानसभेची उमेदवारी नाकारणाऱ्या भारतीय जनता पक्षाने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देऊन महामंत्रिपदाची जबाबदारी सोपविली आहे. संघटनेत अध्यक्षानंतर महामंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना निमंत्रितांमध्ये बसवून त्यांच्यावरची नाराजी पक्षाने कायम ठेवल्याचे बोलले जाते. 

ऊर्जामंत्री असताना बावनकुळे यांचा मंत्रिमंडळ आणि पक्षात चांगलाच बोलबाला होता. ऊर्जावान नेता म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचीही प्रशंसा केली जात होती. नागपूरसह भंडारा व त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकत्त्व त्यांच्यावर सोपविले होते. मात्र, अचानक वरिष्ठांची त्यांच्यावर खफा मर्जी झाली. तीन वेळा निवडून आल्यानंतरही कामठीतून त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. मात्र, बावनकुळे यांनी संयम बाळगला.

पक्षाच्या विरोधात कुठलेही भाष्य केले नाही. मध्यंतरी शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांना ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेत उमेदवारी देऊन बावनकुळे यांचे पुनर्वसन केले जाईल, असेही तर्क लावले जात होते. आता कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देऊन बावनकुळे यांच्यावरची नाराजी दूर झाल्याचे संकेत भाजपने दिले आहे. 

कार्यकारिणीत नागपूरकर 
प्रदेश कार्यकारिणीत माजी महापौर अर्चना डेहनकर मंत्री, ऍड. धर्मपाल मेश्राम कोषाध्यक्ष, माजी महापौर कल्पना पांडे शिक्षक सेल, मिलिंद कानडे आर्थिक, श्‍याम चांदेकर विनकर, जयसिंग चव्हाण दिव्यांग सेल, संजय भेंडे सहकार, विश्‍वास पाठक मीडिया प्रमुख (मुंबई), संजय फांजे प्रदेश कार्यालय सहमंत्री यांना स्थान देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com