महिला पोलीसाने पती असल्याचे सांगून केली प्रियकराची नोंद, अन... 

महिला पोलिस सुजाता ही शहराच्या मध्यभागी असलेल्या शाखेत कार्यरत आहेत. तर अभिजीत हा केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत आहे. ऑक्‍टोबर 2019 मध्ये पोलिस नियंत्रण कक्षात केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एक शिबिर आयोजीत करण्यात आले होते. त्या शिबिरात सुजाता आणि अभिजीतची ओळख झाली होती. तेव्हापासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले.
police logo
police logo

नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस प्रशिक्षण केंद्रातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आपल्या प्रियकराची नोंद पती असल्याचे सांगून केली. त्यामुळे पोलीसांनी तिच्यासोबत प्रियकराचीही "व्यवस्था' केली. त्याच्या पत्नीला माहिती झाल्यावर तिने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे महिला पोलीस कर्मचारी चांगलीच अडचणीत आली आहे. सध्या शहर पोलीस दलात या प्रेम प्रकरणाची जोरात चर्चा सुरू आहे. 

पोलिस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जानुसार, महिला पोलिस कर्मचारी सुजाता (बदललेले नाव) ही नागपूर शहर पोलिस दलातील एका "विशेष' असलेल्या शाखेत कार्यरत आहे. तिच्या कार्यालयातील वरिष्ठांना कोरोना झाल्यामुळे कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांनाही क्‍वॉरंटाईन करण्याचे आदेश होते. त्यामुळे पोलिस कर्मचारी सुजाता आणि तिच्या संपर्कात आलेल्यांना क्‍वॉरंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सुजाताच्या संपर्कात तिचा प्रियकर अभिजीत (बदललेले नाव) हा आला होता. त्यामुळे तिने त्यालाही कोरानाची भीती असल्याचे सांगून तसेच अभिजीतपासून दुरावा सहन न होत नसल्यामुळे थेट पती असल्याचे वरिष्ठांना सांगितले. 

सुजाता आणि अभिजीत हे दोघेही पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्‍वॉरंटाईन झाले. गेल्या तीन दिवसांपासून पती घरी येत नसल्यामुळे चिंतेत असलेली अभिजीतची पत्नी उर्मीला यांना काळजी वाटली. तिने आपल्या पतीच्या नेहमी संपर्कात असलेल्या सुजाताचा पत्ता काढला. ती पोलिस प्रशिक्षण केंद्रात असून तिच्यासोबत आपला पती असल्याची माहिती मिळाली. तिने पोलिस प्रशिक्षण केंद्रात धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांना सत्यस्थिती कथन केली. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे तिने थेट बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तिने पोलिसात लेखी तक्रार केल्यानंतर काल दुपारी पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांचीही भेट घेतल्याचे कळते. 

येथे सुरू झाले प्रेमप्रकरण 
महिला पोलिस सुजाता ही शहराच्या मध्यभागी असलेल्या शाखेत कार्यरत आहेत. तर अभिजीत हा केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत आहे. ऑक्‍टोबर 2019 मध्ये पोलिस नियंत्रण कक्षात केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एक शिबिर आयोजीत करण्यात आले होते. त्या शिबिरात सुजाता आणि अभिजीतची ओळख झाली होती. तेव्हापासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. 

प्रियकर पती असल्याची नोंद 
सुजाताने पोलिस प्रशिक्षण केंद्रातील क्‍वॉरंटाईन केंद्रात अभिजीत हा प्रियकर नसून पती असल्याची नोंद रजिस्टरवर केली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासोबतच अभिजीतचीही केंद्रात राहण्याची व्यवस्था केली. अभिजीत विवाहित असल्याचे माहिती असतानाही सुजाताने कार्यालयाला पती म्हणून नोंद केल्यामुळे तिच्या अडचणींत वाढ होण्याची शक्‍यता आहे.     (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com