शेतकऱ्यांनो काळजी नको, संपूर्ण कापूस खरेदी केला जाईल : सुनील केदार 

आज शेतकऱ्यांच्या 9 गाड्यांतील 250 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. येथे कापूस विक्रीकरिता आलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला परत पाठविण्यात येणार नाही. प्रारंभी डॉ. नितीन राऊत आणि सुनील केदार यांनी कापूस मोजणी यंत्राचे पूजन केले.
Sunil Kedar
Sunil Kedar

नागपूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस जिल्ह्यातील 23 जिनिंग, प्रेसिंग येथे कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडे असलेला संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. 

चिमणाझरी येथील जिनिंग, प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदीला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, जिल्हा परिषद सदस्य वृंदा नागपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अहमद बाबू शेख, निर्मल समूहाचे प्रमोद मानमोडे उपस्थित होते. यावेळी कापूस विक्रीसाठी आलेल्या पहिल्या पाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. यावेळी सीसीआयमार्फत 250 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील मांडवा, बाजारगाव येथेही कापूस खरेदी सुरु आहे. 

निर्मल जिनिंग अँड प्रेसिंग सेंटरची साठवणूक क्षमता 8 हजार क्विंटल आहे. येथे आज शेतकऱ्यांच्या 9 गाड्यांतील 250 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. येथे कापूस विक्रीकरिता आलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला परत पाठविण्यात येणार नाही. प्रारंभी डॉ. नितीन राऊत आणि सुनील केदार यांनी कापूस मोजणी यंत्राचे पूजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com