फडणवीस चार दिवस राहणार नागपुरात, आज पत्रकारांशी साधणार संवाद

ऐन कोरोनाच्या काळात तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली झाल्याने शहरातील बहुसंख्य नागरिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. ही नाराजी सोशल मीडियावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. नेटकरी उघडपणे पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात भाजपची प्रतिमा चांगलीच डागाळली.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शहरात येणार आहेत. दुपारी १ वाजता प्रेस क्लबमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. पुढील चार दिवस येथेच तळ ठोकून राहणार असल्याचीही माहिती आहे. या ऑगस्ट महिन्यात त्यांनी कोरोनाचा आढावा घेतला होता, आज तब्बल महिनाभरानंतर ते नागपुरात आहेत. कोरोनासोबतच पदवीधर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाबाबत ते पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. 

मागील ऑगस्टमध्ये त्यांनी महापालिकेत शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत त्यांनी सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचे भाकीत करीत महापालिकेला चाचण्या वाढविण्याची सूचना केली होती. महिनाभराने पुन्हा ते कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. ते चार दिवस शहरात राहणार असल्याचे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या आढावा बैठकीसोबतच ते येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातही भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सूत्राने सांगितले.

प्रा. अनिल सोले यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. यात महापौर संदीप जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. महापौर संदीप जोशी यांनीही वाढदिवसाला महापालिकेची निवडणूक यापुढे लढणार नसल्याची घोषणा करीत उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

भाजपची डागाळलेली प्रतिमा सुधारणार? 
ऐन कोरोनाच्या काळात तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली झाल्याने शहरातील बहुसंख्य नागरिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. ही नाराजी सोशल मीडियावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. नेटकरी उघडपणे पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात भाजपची प्रतिमा चांगलीच डागाळली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर नाराजीचा परिणाम होऊ नये, यासाठी भाजपची डागाळलेली प्रतिमा सावरण्यावर फडणवीस भर देतात काय, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.          (Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com