सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंता गुप्ता निलंबित...

सीईओ योगेश कुंभेजकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीकरता पाच सदस्यीय समिती गठित केली आहे. गुप्ता यांना एका कंत्राटदाराकडून ७५ हजाराची लाच घेण्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती.
ZP Nagpur
ZP Nagpur

नागपूर : जिल्हा परिषदेच्या Zillha Parishad लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हरीश गुप्ता executive engineer Harish Gupta यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. लाच प्रकरणात त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. पण तेव्हा त्यांना लगेच दुसऱ्याच दिवशी जामीन मंजूर झाला होता आणि त्यानंतर ते लगेच कार्यालयात रूजुही झाले असल्याचे सांगण्यात येते. 

हरीश गुप्ता यांनी जिल्हा परिषदेतील सुरक्षा ठेव घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातही हा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. यात १५ पेक्षा जास्त कंत्राटदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी नानक कंस्ट्रक्शन कंपनी विरोधात सदर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेचे वातावरण चांगलेच तापले असून यात कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. 

सीईओ योगेश कुंभेजकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीकरता पाच सदस्यीय समिती गठित केली आहे. गुप्ता यांना एका कंत्राटदाराकडून ७५ हजाराची लाच घेण्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्यांना दुसऱ्याच दिवशी जामीनही मंजूर झाला होता. सुरक्षा ठेव घोटाळा बाहेर काढल्यानेच त्यांना गोवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान आज जलसंधारण विभागाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. 

हेमकेंचा प्रभार काढला 
संजीव हेमके यांच्याकडून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार काढण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील प्रवीण बुराडे यांना कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. विजय टाकळीकर यांना लाच प्रकरणात अटक झाल्याने हेमके यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार होता. सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरणात त्यांच्या कार्यशैलीवर मंत्री सुनील केदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनही त्यांच्या कामावर समाधानी नसल्याचे सांगण्यात येते. सुरक्षा ठेव घोटाळ्याच्या गांभीर्याची दखल घेत शासनाने कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती केल्याची चर्चा आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com